ठरलं! आता रोहित शर्मा कसोटीत करणार या क्रमांकावर फलंदाजी

2 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी आज(12 सप्टेंबर) बीसीसीआयने 15 जणांचा भारतीय संघ जाहीर केला आहे.

या संघात भारताचा फलंदाज रोहित शर्माला संधी मिळाली असून तो या मालिकेत सलामीला फलंदाजी करणार असल्याचे निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

नुकत्याच वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात रोहितला संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याच्या फलंदाजी क्रमांकाबद्दल चर्चा रंगल्या होत्या. तसेच अनेक माजी क्रिकेटपटूंनी रोहितला कसोटीतही सलामीला संधी द्यावी असे म्हटले होते.

आता रोहितची दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मयंक अगरवालबरोबर सलामीला फलंदाजी करण्यासाठी निवड झाली आहे.

याबद्दल सांगताना एमएसके प्रसाद म्हणाले, ‘रोहितची संघात सलामीवीर फलंदाज म्हणून निवड झाली आहे. तो तिन्ही सामन्यात तसेच बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन संघासाठीही सलामीला फलंदाजी करेल. आम्ही त्याला कसोटीत सलामीला फलंदाजी करण्याची संधी देऊ इच्छित आहे.’

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करणाऱ्या रोहितने आत्तापर्यंत एकदाही कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी केलेली नाही.

तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी 15 जणांच्या भारतीय संघातून केएल राहुलला मात्र वगळण्यात आले आहे, तर शुबमन गिलला संधी देण्यात आली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

केएल राहुलला टीम इंडियातून वगळले; गिलला मिळाली द.आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संधी

११ वर्षांपूर्वी कानाखाली मारलेल्या श्रीसंतला हरभजनने ट्विट करत दिल्या खास शुभेच्छा…

आज विराटचा होणार मोठा सन्मान; फिरोजशहा कोटला स्टेडीयमचेही बदलणार नाव

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.