५१ वर्षांपुर्वी सर गॅरी सोबर्स यांनी एकाच षटकांत चक्क ६ षटकार खेचले होते. ३१ ऑगस्ट १९६८ रोजी पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये असे काहीतरी घडले होते. १९६८च्या हंगामात ग्लॅमोर्गन आणि नाॅटींगघमशायर दरम्यान झालेल्या सामन्यात ते नाॅटींगघमशायरचे नेतृत्व करत होते.
एकवेळ नाॅटींगशायर ५ बाद ३०८ अशी असताना स्वानसीमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात सोबर्स यांनी झटपट धावा करण्यासाठी ७६ धावांची ही आक्रमक खेळी केली होती. लवकर डाव घोषीत करुन गोलंदाजांना लगेच गोलंदाजीची संधी देण्यासाठी त्यांनी आक्रमक खेळी करण्याचा हा निर्णय घेतला होता.
त्यावेळी माल्कन नॅश या कमनशिबी गोलंदाजाला तेव्हा या स्फोटक फलंदाजीचा सामना करावा लागला. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या नॅशकडे कर्णधाराने चेंडू सोपवला. पहिल्याच चेंडूवर षटकार बसल्यावर त्याने गोलंदाजीत बदल केले परंतु सोबर्स यांनी त्याला ६ षटकार खेचलेच.
यातील एक चेंडू तर सोबर्स यांच्या बॅटवर नीट आला नाही. त्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षकाने त्यांचा झेल घेतला परंतु तो तेव्हा सीमारेषेच्या बाहेर असल्यामुळे हा झेल देण्यात आला नाही. शेवटच्या चेंडूवर तर सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवर असुनही त्यांनी षटकार खेचला होता.
यानंतर त्यांनी लगेच डाव घोषीत केला आणि ते हा सामना पुढे जाऊन जिंकलेही.
पुढे १७ वर्षांनी रवी शास्त्री यांनी मुंबई विरुद्ध बडोदा सामन्यात (१९८५) हा पराक्रम केला. तर २००७ला युवराज सिंगने टी२० विश्वचषकात हा पराक्रम केला. तसेच हर्षल गिब्जनेही २००७मध्येच ५० षटकांच्या विश्वचषकात विंडीजमध्ये नेदरलॅंडविरुद्ध हा कारनामा केला होता.
50 years ago today, @TrentBridge & @westindies legend Sir Garry Sobers hit 6 sixes in an over…
Enjoy watching history…! ???????????? pic.twitter.com/XLqZcYra3c
— BBC Nottingham Sport (@BBCRNS) August 31, 2018
Today in 1968: Watch Sir Garry Sobers smash 36 runs (6 6 6 6 6 6) off an over from Malcolm Nash at Swanseahttps://t.co/Zn0HZn3lyk
— Mohandas Menon (@mohanstatsman) August 31, 2017
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–चौथ्या ऍशेस सामन्याआधी इंग्लंड संघाला बसला मोठा धक्का
–विराट कोहलीच्या टीम इंडियाबाबत असे दुसऱ्यांदाच झाले
–विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया