धवनला विश्रांती, पहिल्या टी२० साठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

आजपासून(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दोन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून भारताकडून युवा गोलंदाज मयंक मार्कंडे पदार्पण करणार आहे. मार्कंडेला विजय शंकर ऐवजी भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात संधी देण्यात आली आहे.

याबरोबरच शिखर धवनला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या ऐवजी बऱ्याच दिवसापासून भारतीय संघातून बाहेर असणाऱ्या केएल राहुलला सलामीला फलंदाजी करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. तर भुवनेश्वर कुमार ऐवजी उमेश यादवला अंतिम 11 जणांच्या संघात संधी दिली आहे.

ऑस्ट्रेलियाकडून पिटर हँड्सकॉम्ब टी20मध्ये पदार्पण करत आहे. तो या सामन्यात यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळेल. तसेच डॉर्सी शॉर्ट सलामीला फलंदाजी करेल.

असे आहेत अंतिम 11 जणांचे संघ-

भारत – विराट कोहली(कर्णधार),  रोहित शर्मा, एमएस धोनी(यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, रिषभ पंत, कृणाल पंड्या, केएल राहुल, जसप्रीत  बुमराह, युझवेंद्र चहल, उमेश यादव, मयांक मार्कंडे.

ऑस्ट्रेलिया – ऍरॉन फिंच (कर्णधार), डॉर्सी शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, पीटर हँड्सकोम्ब (यष्टीरक्षक), ऍशटन टर्नर, नॅथन कुल्टर-नाईल, पॅट कमिन्स, झाय रिचर्डसन, जेसन बेरेन्डडॉर्फ, ऍडम झम्पा

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहलीच्या मते हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे सर्वात धोकादायक

 विश्वचषकाआधी कर्णधार कोहलीचा टीम इंडियाच्या खेळाडूंना खास सल्ला…

आजपासून सुरु होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेत या विक्रमांकडे असेल लक्ष

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.