पुणे। पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत बाद फेरीत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाने फ्लाईंग हॉक्स संघाचा 38-36 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धोत बाद फेरीच्या सामन्यात कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाने फ्लाईंग हॉक्स संघाचा 38-36 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. 10वर्षाखालील मुलांच्या गटात निल केळकरने सक्षम भन्सालीचा 4-0 असा तर मुलींच्या गटात मृणाल शेळकेने जसलीन कटरियाचा 4-0 असा एकतर्फी पराभव करत सामन्यात आघाडी घेतली.
14वर्षाखालील मुलींच्या गटात रुमा गाईकैवारीने अंजली निंबाळकरचा 6-0 असा सहज पराभव करत संघाची आघाडी कायम राखली.
14वर्षाखालील दुहेरी गटात अर्जुन अभ्यंकर व वेदांत ससाणे यांनी श्लोक गांधी व तनिष बेलगलकर यांचा 6-2 असा तर 10वर्षाखालील दुहेरी गट आर्यन किर्तने व संमिहन देशमुख या जोडीने देव गुहालेवाला व निव गोजिया यांचा 4-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: बाद फेरी:
कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स वि.वि फ्लाईंग हॉक्स: 38-36
एकेरी:
8वर्षाखालील मिश्र गट: श्रावी देवरे पराभूत वि अंशुल पुजारी 3-4 ;
10वर्षाखालील मुले: निल केळकर वि.वि सक्षम भन्साली 4-0 ;
10वर्षाखालील मुली: मृणाल शेळके वि.वि जसलीन कटरिया 4-0;
12वर्षाखालील मुले: आरूष मिश्रा पराभूत वि अर्जुन किर्तने 3-6 ;
12वर्षाखालील मुली: रितीका मोरे पराभूत वि श्रावणी देशमुख 2-6 ;
14वर्षाखालील मुले: अनमोल नागपुरे पराभूत वि सुधांशू सावंत 4-6;
14वर्षाखालील मुली: रुमा गाईकैवारी वि.वि अंजली निंबाळकर 6-0;
कुमार दुहेरी गट: प्रणव इंगळे/रियान मुजगुले पराभूत वि पार्थ देवरुखकर/चिराग चौधरी 2-6 ;
14वर्षाखालील दुहेरी गट: अर्जुन अभ्यंकर/वेदांत ससाणे वि.वि श्लोक गांधी/तनिष बेलगलकर 6-2;
10वर्षाखालील दुहेरी गट: आर्यन किर्तने/संमिहन देशमुख वि.वि देव गुहालेवाला/निव गोजिया 4-0;
मिश्र दुहेरी गट: डेलिशा रामघट्टा/अथर्व जोशी पराभूत वि कौशिकी समंथा/तेज ओक 0-6).