बरोबर ८वर्षांपुर्वी ३१ ऑगस्ट २०११ रोजी भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला आणि शेवटचा टी20 सामना खेळला होता.
२०११मध्ये भारतीय संघ भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर ४ कसोटी, १ टी२० आणि ५ वनडे सामन्यांसाठी रवाना झाली होती. या दौऱ्यातील कसोटी सामन्यात भारताच ४-० असा दणदणीत पराभव झाला होता. पण याच मालिकेत पराभव होऊनही राहुल द्रविड मालिकावीर ठरला होता.
त्यानंतर ओल्ड ट्रॅफेड, मॅंचेस्टरला झालेल्या एकमेव टी२० सामन्यात राहुल द्रविड खेळला होता. हा सामना ३१ ऑगस्टला झाला होता. या सामन्यात द्रविडने बरोबर ३१ धावा केल्या होत्या. त्यात द्रविडने ३ षटकार खेचले होते. हे तिन्ही षटकार त्याने समित पटेलच्या गोलंदाजीवर लागोपाठच्या चेंडूवर मारले होते.
हा सामना अखेर इंग्लंडने ६ विकेट्सने जिंकला होता. द्रवि़ड त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत हा एकमेक टी20 सामना खेळला.
या टी20 सामन्यानंतर झालेल्या वनडे मालिकेतील ५वा सामना हा द्रविडचा शेवटचा वनडे सामना ठरला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
–व्हिडिओ: बरोबर ५१ वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार