‘एक हजारी मनसबदार’ परदीप नरवालने प्रो कबड्डीत रचला मोठा इतिहास

प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सोमवारी(9 सप्टेंबर) 83 वा सामना तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स संघात पार पडला. या सामन्यात पटनाने 51-25 अशा फरकाने दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच कर्णधार परदीप नरवालने प्रो कबड्डीमध्ये 1000 रेडींग पॉइंट्स पूर्ण करत इतिहास रचला आहे.

सोमवारी नेताजी सुभाषचंद्र बोस इंडोर स्टेडीयममध्ये पार पडलेल्या या सामन्यात परदीपने 26 रेडींग पॉइंट्स मिळवले. त्यामुळे त्याचे आता प्रो कबड्डीमध्ये 99 सामन्यात 1016 रेंडींग पॉइंट्स झाले आहेत. परदीप प्रो कबड्डीमध्ये 1000 रेडींग पॉइंट्स मिळवण्याचा टप्पा पार करणारा पहिला आणि सध्यातरी एकमेव खेळाडू आहे.

तसेच या सामन्यात परदीपने मिळवलेले 26 पॉइंट्स हे सातव्या मोसमातील एका सामन्यात मिळवलेले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वैयक्तिक गुण आहेत. याआधी पवन सेहरावतने या मोसमातील एका सामन्यात 29 गुण मिळवले आहेत.

त्याचबरोबर प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक पॉइंट्स मिळवण्यामध्येही परदीप अव्वल क्रमांकावर आहे. त्याने प्रो कबड्डीमध्ये 99 सामन्यात एकूण 1023 पॉइंट्स मिळवले आहेत. त्यामुळे प्रो कबड्डीत 1000 पॉइंट्स मिळवणाराही तो पहिला आणि सध्यातरी एकमेक कबड्डीपटू आहे.

या यादीत त्याच्या पाठोपाठ 977 गुणांसह राहुल चौधरी आहे. राहुललाही प्रो कबड्डीत 1000 पॉइंट्सचा टप्पा पार करण्याची या मोसमात संधी आहे.

#प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक रेडींग पॉइंट्स मिळवणारे कबड्डीपटू – 

1016 – परदीप नरवाल (99 सामने)

920 – राहुल चौधरी (115 सामने)

790 – अजय ठाकूर (115 सामने)

790 – दीपक हुड्डा (116 सामने)

648 – रोहित कुमार (87 सामने)

#प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक पॉइंट्स(रेडींग आणि टॅकल पॉइंट्स) मिळवणारे कबड्डीपटू:

1023 – परदीप नरवाल (99 सामने)

977 – राहुल चौधरी (115 सामने)

873 – दीपक हुडा (116 सामने)

811 – अजय ठाकूर (115 सामने)

687 – रोहित कुमार (87 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

…आणि भारताला नेहमीच नडलेल्या कूकने सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्याची संधी दवडली!!

वाढदिवस विशेष: स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.