Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2023 स्पर्धेत माव्हरिक्स संघाचा सलग तिसरा विजय

नवव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2023 स्पर्धेत माव्हरिक्स संघाचा सलग तिसरा विजय

February 16, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Untitled design

Photo Courtesy: Twitter


पुणे, 16 फेब्रुवारी 2023 – पुना क्लब लिमिटेडच्या वतीने नवव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेत साखळी फेरीत माव्हरिक्स संघाने व्हीएस टायगर्स संघाचा पराभव करत स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला.

पुना क्लब क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत रौनक ढोले पाटीलच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर माव्हरिक्स संघाने व्हीएस टायगर्स संघाचा 32 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना माव्हरिक्स संघाने 6 षटकात 1 गडी गमावत 89 धावा केल्या. यात रौनक ढोले पाटीलने 22 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांची फटकेबाजी करत नाबाद 56 धावा करून संघाचा डाव भक्कम केला. मयुर बाफनाने नाबाद 19 धावा करून रौनकला सुरेख साथ दिली. 89 धावांच्या आव्हानाचा सामना करताना तुषार व विजय सामंत यांच्या अचूक गोलंदाजीने व्हीएस टायगर्स संघाचा डाव 6 षटकात 2 बाद 57 धावांत रोखत संघाला विजय मिळवून दिला. रौनक ढोले पाटील सामनावीर ठरला.

अन्य लढतीत अमन पारेखच्या नाबाद फलंदाजीच्या बळावर अर्थ गोरिलाज् संघने सेलर्स संघाचा सर्व 8 गडी राखून तर अधिश शहाच्या नाबाद 63 धावांसह किंग्ज संघाने जॅग्वार्स संगाचा 11 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
माव्हरिक्स: 6 षटकात 1 बाद 89 धावा (रौनक ढोले पाटील नाबाद 56(22, 4×4,4×6), मयुर बाफना नाबाद 19(8, 1×4,2×6), किरण देशमुख 10, अनुज मुथा 1-10) वि.वि व्हीएस टायगर्स: 6षटकात 2 बाद 57 धावा(झियान ताबल नाबाद 29(15, 4×6), विक्रम काकडे नाबाद 19(12, 1×4,1×6), तुषार 1-5, विजय सामंत 1-9) सामनावीर- रौनक ढोले पाटील ; माव्हरिक्स संघ 32 धावांनी विजयी.

सेलर्स: 6 षटकात 6 बाद 46 धावा(विमल हंसराज 16(9,3×4), सुमिरन मेहता 11, संदिप अबिचंदानी 2-6, अर्जुन मोतादू 1-4) पराभूत वि अर्थ गोरिलाज्: 4 षटकात बिनबाद 47 धावा(अमन पारेख नाबाद 31(14, 3×4, 2×6), आर्यन गाडगीळ नाबाद 16(10, 1×4) सामनावीर- अमन पारेख ; अर्थ गोरिलाज् संघ 8 गडी राखून विजयी.

किंग्ज: 6 षटकात बिनबाद 96 धावा(अधिश शहा नाबाद 63(24, 7×4,3×6), भार्गव पाठक नाबाद 28(13, 5×4) वि.वि जॅग्वार्स: 6 षटकात 4 बाद 85 धावा(अभिषेक ताम्हाणे नाबाद 67(22, 3×4, 7×6), रोहित जाधव 1-12, विशाल सेठ 1-13) सामनावीर- अधिश शहा ; किंग्ज संघ 11 धावांनी विजयी.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

शॉकिंग! मुंबईच्या रस्त्यावर पृथ्वी शॉची मॉडेलला धक्काबुक्की, तुम्हीही पाहा व्हिडिओ
ब्रेकिंग । सेल्फी मागणाऱ्या चाहत्याला खटकले पृथ्वी शॉचे वागणे! गाडीवर केली दगडफेक


Next Post
File Photo

पय्याडेचा ग्लोरियस विजय, राजावाडीसह फोर्ट यंगस्टर्स, स्पोर्टस्फिल्ड, पय्याडे उपांत्य फेरीत

Photo Courtesy: Twitter/Bharat Sundarsen

हे काहीतरी नवीनच! दिल्ली कसोटीआधी स्मिथ-लॅब्युशेनची 'स्पेशल प्रॅक्टिस', छायाचित्रे व्हायरल

South-Africa

BREAKING: अवघ्या 30 व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, नुकतीच गाजवलेली एसए टी20 लीग

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143