गुफिक टीम टेनिस चॅम्पियनशिपमध्ये रविवार ता. 17 मार्चला, डेक्कन जिमखाना येथे झालेल्या अंतिम सामन्यात डेक्कन चार्जर्स नी नॉर्थवेस्ट टायगर्स चा 21-13 असा दणदणीत पराभव केला
100 अधिक वयोगटात माधव घाटे व ऋषिकेश पाटसकर यांनी अभय जेमिनिस व अभिजीत मुजुमदार ह्या जोडीवर 6-3 अशी मात केली.
खुल्या गटाच्या पहिल्या सामन्यात अजय कामत व पार्थ चिवटे यांनी दिलेली लढत अपुरी पडली. ते केदार शहा व मानसिंग अथरे या जोडी विरुद्ध 3-6 असे पराभूत झाले.
90 अधिक वयोगटात जयदीप दाते व आशिष पुंगलिया यांनी ऋतुपर्ण कुलकर्णी व अमित नाटेकर यांच्यावर 6- 3 असा सहज विजय मिळवला.
खुल्या गटाच्या दुसऱ्या व निर्णायक सामन्यात मुकुंद जोशी व ऋषिकेश पाटसकर यांनी वर्चस्व राखत परज नाटेकर व अभिजित मुजुमदार या जोडीवर 6-1 असा लीलया विजय मिळवला.