मुंबई: वंश गांधीच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर जेबीसीएन इंटरनॅशनल स्कूल संघाने मुंबईइंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी मोठ्या फरकाने विजय मिळवला. मुंबई टप्प्यातील १४ वर्षांखालील मुले गटातील अन्य सामन्यांत आराध्य भिसेनेही शतकी खेळी केली, तर प्रथमेश हातेरारने ७ विकेट्स घेतल्या. १६ वर्षांखालील मुलींमध्ये किमया राणेच्या फतकेबाजीने सर्वांना खिळवून ठेवले.
जेबीसीएन इंटरनॅशनल स्कूल संघाने १४ वर्षांखालील मुले गटात दी ब्लॉसम एसटीई स्कूल ( मरिन लाईन्स) संघावर १४० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना जेबीसीएन इंटरनॅशनल स्कूल संघाने ७ बाद २८१ धावा केल्या. यात वंश गांधीच्या १३४ चेंडूंत १८२ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीचा मोठा वाटा होता. कुणाल जैनने ३४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दी ब्लॉसम एसटीई स्कूल संघाचे सर्व फलंदाज ३२ षटकांत १४१ धावांवर माघारी परतले.
१६ वर्षांखालील मुली गटात किमया राणेच्या १०२ चेंडूंत ११२ धावांच्या जोरावर श्री मा विद्यालय ( ठाणे) संघाने २३ षटकांत ८ बाद २३८ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरार सेंट ॲन्ने कॉन्व्हेंट स्कूल ( वसई) संघाला २१.४ षटकांत ९ बाद १४१ धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक
१४ वर्षांखालील मुले
आरआर एज्युकेशन ट्रस्ट इंग्लिश हायस्कूल ( मुलुंड) ३२.३ षटकांत सर्वबाद १६८ ( निशांत बागायतकर ५७, अक्षय गुप्ता ३१) वि. वि. सेंट जोसेफ हायस्कूल सीबीएसई ( पनवेल) १८.३ षटकांत सर्वबाद ७५; सामनावीर- प्रथमेश हातेरार ( ७ विकेट्स)
बिल्लाबॉंग हायस्कूल ( ठाणे) ७ बाद २८९ ( आराध्य भिसे १००, सोहम दिवाते ९६) वि. वि. सेंट फ्रान्सिस हायस्कूल ( बोरीवली) २३.२ षटकांत सर्वबाद १२१; सामनावीर – आराध्य भिसे ( १०० धावा)
जेबीसीएन इंटरनॅशनल स्कूल ( बोरीवली) ७ बाद २८१ ( वंश गांधी १८२, कुणाल जैन ३४) वि. वि. दी ब्लॉसम एसटीई स्कूल ( मरिन लाईन्स) ३२ षटकांत सर्वबाद १४१; सामनावीर – वंश गांधी ( १३४ चेंडूंत १८२ धावा)
१६ वर्षांखालील मुली
श्री मा विद्यालय ( ठाणे) २३ षटकांत ८ बाद २३८ ( किमया राणे ११८, नितील नेगी १६) वि. वि. सेंट ॲन्ने कॉन्व्हेंट स्कूल ( वसई) २१.४ षटकांत ९ बाद १४१; सर्वोत्तम खेळाडू – किमया राणे ( १०२ चेंडूंत ११८ धावा)
सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स हायस्कूल १८ षटकांत ३ बाद ३५३ ( प्रांजल मळेकर ६४*, साची बेलोसे ३३) वि. वि. शेठ विरचंद देवजी गर्ल्स स्कूल १६.३ षटकांत सर्वबाद ४८; सर्वोत्तम खेळाडू – प्रांजल मळेकर ( ५९ चेंडूंत नाबाद ६४ धावा)