सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने पुरुष व महिला गट सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०१९ चा आयोजन करण्यात आले आहे.
सावंतवाडी येथील आर पी डी हायस्कूलच्या मैदानावर दिनांक ७ डिसेंबर व ८ डिसेंबर २०१९ दरम्यान ही स्पर्धा पार पडेल. सदर स्पर्धा मातीच्या क्रीडांगणवर खेळवली जाणार असून स्पर्धेत जिल्हातील मातब्बर पुरुष व महिला संघ सहभागी होतील.
यास्पर्धेतून निवडला जाणार पुरुष व महिला संघ चिपळूण येथे होणाऱ्या ६७ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.