शनिवारी (29 ऑक्टोबर) टी-20 विश्वचषक 2022 मधील 27 वा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील ही लढत चांगलीच रोमांचक झाली. न्यूझीलंडचा मध्यक्रमातील फलंदाज ग्लेन फिलिप्स याने स्वतःच्या संघासाठी या सामन्यात शतकीय योगदान दिले. न्याझीलंडच्याने फिलिप्सच्या या वादळी खेळीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तर श्रीलंका मात्र एकट्या फिलिप्स एवढ्या धावाही करू शकली नाही. एकटा फिलिप्स संपूर्ण श्रीलंकन संघावर भारी पडला.
ग्लेन फिलिस्प (Glenn Phillips) न्यूझीलंड संघासाठी पन्नास पेक्षा जास्त टी-20 सामने खेळला आहे आणि त्याला या फॉरमॅटमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. फिलिप्सने शनिवारी श्रीलंकन संघाविरुद्ध खेळताना त्याची गुणवत्ता दाखवून दिली. अवघ्या 61 चेंडूत त्याने शतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात एकूण 64 चेंडू खेळळे आणि 104 धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान फिलिप्सच्या बॅटमधून 10 चौकार आणि 4 षटकार निघाले. न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्सच्या नुकसानावर 167 धावा केल्या. असे असले तरी, फिलिप्स सोडून न्यूझीलंडचा एकही फलंदाज 22 धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही.
168 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी श्रीलंकन संघ जेव्हा फलंदाजीला आला, तेव्हा त्यांनी चाहत्यांची चांगलीच निराशा केली. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19.2 षटकांमध्ये अवघ्या 102 धावा करून सर्वबाद झाला. म्हणजेच श्रीलंकेच्या सर्व फलंदाजांनी मिळून जितक्या धावा केल्या, त्यापेक्षा जास्त धावा एकट्या फिलिप्सने या सामन्यात कुटल्या. श्रीलंकन संघासाठी त्यांचा कर्णधारन दासून शनाका सर्वाधिक 35, तर भानुका राजपक्षे 34 धावांचे योगदान देऊ शकले.
सामन्याच्या नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी केली. तसेच नंतर गोलंदाजी करताना देखील त्यांचा संघ उत्कृष्ट प्रदर्शन करू शकला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्डने चार षटकांमध्ये अवघ्या 13 धावा दिल्या आणि सर्वाधिक 4 विकेट्स देखील घेतल्या. मिचेल सॅटनर आणि इश सोढी यांनीही प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: सामन्याआधी आफ्रिकी खेळाडूची विराटला वॉर्निंग! म्हणाला, ‘तो फॉर्ममध्ये आला असला तरी आमचे गोलंदाज….’
सलग दोन विजयांनंतर देखील भारताला ‘ही’ भीती, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असेल अग्निपरीक्षा