fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

मुंबई सुपर लीगच्या लिलावात 16 वर्षीय दिया चितळेची आघाडी 

मुंबई | इलेव्हन स्पोर्ट्स मुंबई सुपर लीग (एमएसएल) स्पर्धेच्या लिलावात अनेक आघाडीच्या टेबल टेनिस खेळाडूंचा समावेश असून देखील दिया पराग चितळेला पिंग पँथर्स संघाने 38,000 रुपयांना आपल्या संघामध्ये घेतले. नॅशनल स्पोर्ट्स क्‍लब ऑफ इंडिया येथे मंगळवारी दुपारी लिलाव पार पाडला.
 
ही स्पर्धा पुरुष, महिला, ज्युनियर मुले, ज्युनियर मुली, कॅडेट मुले आणि वेट्रन्स गटात पार पडणार आहे. लिलावात 16 वर्षीय दियावर सर्वांच्या नजरा होत्या. 10 फ्रेंचायझींना 1,05,000 रुपये लिलावासाठी देण्यात आले होते. सर्वच फ्रेंचायझींचा कल हा युवा खेळाडूंकडे होता. किंग पोंग संघाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळवणा-या मधुरिका पाटकरला आपल्या संघात घेतले.
गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ असलेल्या ब्लेझिंग बॅशर्सचा संघ देखील लिलावात मागे राहिला नाही. त्यांनी आपले जेतेपद कायम राखण्यावर भर देत जागतिक क्रमवारीत 57 व्या स्थानी (18 वर्षाखालील मुले) असलेल्या रिगन अल्बुक्युरेक्युला आपल्या संघामध्ये घेतले. तर, गेल्या वर्षी थोडक्यात जेतेपद गमावणा-या एस संघाने सेन्होरा डिसूझाला आपल्या संघात सामावून घेतले.
पार पडलेल्या लिलावात सिद्धेश पांडे (35,000 रुपये) याला सुप्रिम फायटर्सने, दिपीत पाटीलला (31,500 रुपये) वेस्ट कोस्ट रेंजर्सने, दिव्या देशपांडेला (30,500 रुपये) सेंच्युरी वॉरियर्सने, रविंद्र कोटयनला (29,000 रुपये) फँटम स्टार्सने तर, सनिल शेट्टीला (28,500 रुपये) द टॉपस्पिनर्सने सहभागी करुन घेतले.
 
या स्पर्धेत एस, ब्लेझिंग बॅशर्स, सेंच्युरी वॉरियर्स, किंग पोंग, कूल स्मॅशर्स,फँटम स्टार्स, पिंग पँथर्स, सुप्रिम फायटर्स, द टॉपस्पिनर्स, वेस्ट कोस्ट रेंजर्स या दहा फ्रेंचायझींचा समावेश लीगमध्ये आहे. या संघांना पाच-पाचच्या दोन गटात विभागण्यात येणार आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ नंतर उपांत्यफेरीत एकमेकांसमोर असतील.
You might also like