जगप्रसिद्ध टी२० लीग अर्थातच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाची जय्यत तयारी सुरू आहे. १८ फेब्रुवारी रोजी या हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. तत्पुर्वी आयपीएलच्या गवर्निंग काउंसिलने लिलावात उतरवण्यात येणाऱ्या २९२ खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताव्यतिरिक्त इतर देशांच्या १२८ खेळाडूंचाही समावेश आहे.
लिलावासाठी उपलब्ध असणाऱ्या अंतिम खेळाडूंची यादी झाली जाहीर
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी नावनोंदणी केलेल्या १,०९७ खेळाडूंची यादी जाहीर केली होती. त्यानंतर, ११ फेब्रुवारी रोजी लिलावासाठी अंतिम निवड झालेल्या २९२ खेळाडूंची नावे उघड केली. ज्यामध्ये, १६४ भारतीय व १२८ विदेशी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. १८ तारखेला चेन्नई येथे होणाऱ्या लिलावात यापैकी जास्तीत जास्त ६१ खेळाडूंवर बोली लावली जाईल.
भारताबाहेरील विविध देशांच्या १२८ क्रिकेटपटूंचा समावेश
आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी उपलब्ध असणाऱ्या १२८ विदेशी क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक ३५ क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाचे आहेत. त्यापाठोपाठ, न्यूझीलंडचे २० तर वेस्ट इंडीजचे १९ क्रिकेटपटू लिलावात असतील. इंग्लंडचे १७ तर दक्षिण आफ्रिकेचे १२ खेळाडू या लिलावात सहभागी आहेत. श्रीलंकेचे ९, अफगाणिस्तानचे ७ तर बांगलादेशचे ४ क्रिकेटपटू या लिलावात असतील. अमेरिका, युएई व नेपाळ यांचे सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी एक खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील.
सर्वाधिक मूळ किंमत असलेले १० खेळाडू
आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी उपलब्ध असणाऱ्या खेळाडूंपैकी ८ विदेशी खेळाडूंची आधारभूत किंमत २ कोटी रुपये आहे. ज्यामध्ये, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, शाकिब अल हसन, सॅम बिलिंग्स, जेसन रॉय, मार्क वूड, मोईन अली, लियाम प्लंकेट या खेळाडूंचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऐतिहासिक! सोशल मीडियावर ५०० मिलियन फॉलोअर्स असणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील पहिलाच खेळाडू