पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत गटसाखळी फेरीत पीवायसी वॉरियर्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत बाद फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत पहिल्या सामन्यात पीवायसी वॉरियर्स संघाने अ गटात अव्वल स्थानी असणाऱ्या खार जिमखाना संघाचा 2-1 असा पराभव केला. सामन्यात पीवायसीच्या राजवर्धन जोशीने खार जिमखानाच्या स्पर्श फेरवानीचा 29-42, 80-33, 07-36, 63-17, 43-18 असा पराभव करून आघाडी घेतली.
त्यानंतर पीवायसीच्या आदित्य देशपांडेला खार जिमखानाच्या रिषभ ठक्करकडून 43-22, 27-71, 23-48, 27-83 असा पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या लढतीत खार जिमखानाचा ईशप्रित चड्डा उपस्थित राहू न शकल्यामुळे पीवायसीच्या योगेश लोहियाला पूढे चाल देण्यात आली. दुसऱ्या सामन्यात पीवायसी वॅरियर्स संघाने फायर बॉल संघाचा 3-0 असा सहज पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला.
याच गटात पहिल्या सामन्यात फायर बॉल्स संघाने क्यू मास्टर्स ब संघाचा 3-0, तर दुसऱ्या सामन्यात फायर बॉल्स संघाने क्यू क्लब किलर्सचा 2-1 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. फ गटात समर खंडेलवाल, जयदीप खांडेकर, सुशील ढोंसळे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर डेक्कन प्रोफेशनल्स संघाने प्राधिकरण युथ फोरमचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला.
एकतर्फी झालेल्या लढतीत इ गटात कॉर्नर पॉकेट शूटर्स संघाने ऑटो पॉट्स संघावर 3-0 अशा फरकाने सनसनाटी विजय मिळवला. यामध्ये कॉर्नर पॉकेट शूटर्सच्या शोऐब खान याने ऑटो पॉट्सच्या रुषभ जैनचा 62-15, 19-74, 41-01, 76-30 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात संदिप गुलाटी याने सुरेख खेळाचे प्रदर्शन करत आपल्या खेळीत दुसऱ्या फ्रेममध्ये 90 गुणांचा ब्रेक नोंदवून पारस शाहचा 42-15, 114(90)-01, 44-11 असा पराभव केला.
तिसऱ्या लढतीत कॉर्नर पॉकेट शूटर्सच्या शिवम अरोराने लव बोरीचा याचा 22-18, 80(61)- 15, 44-09 असा पराभव करून संघाला 3-0 असा विजय मिळवून दिला. शिवम अरोरा याने आपल्या खेळीत दुसऱ्या फ्रेममध्ये 61 गुणांचा ब्रेक नोंदविला. ब गटात पूना क्लब अ संघाने आरसीबीसी संघाला 3-0 असे नमविले. पूना क्लबच्या विग्नेश संघवीने दुसऱ्या फ्रेममध्ये 67 गुणांचा ब्रेक नोंदविला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
गट अ: फायर बॉल्स वि.वि.क्यू मास्टर्स ब 3-0(अमेय काळेकर वि.वि.तुषार सवादी 32-08, 37-56, 28-17, 64-32; पियुश लिंबाड वि.वि.अभिषेक श्रीवास्तव 32-31, 60-16, 56-11; नितीन भोसले वि.वि.आर्यन राजहंस 32-06, 61-28, 08-36, 24-34, 33-12);
गट अ: फायर बॉल्स वि.वि.क्यू क्लब किलर्स 2-1(अमेय काळेकर वि.वि.विशाल रजनी 10-37, 46-05, 41-12, 37-78, 31-21; नितीन भोसले पराभूत वि.अमरदीप घोडके 12-39, 14-52, 11-34; पियुश लिंबाड वि.वि.प्रसाद परादे 35-19, 42-66, 20-33, 48-24, 51-38);
गट अ: पीवायसी वॉरियर्स वि.वि.खार जिमखाना 2-1(राजवर्धन जोशी वि.वि.स्पर्श फेरवानी 29-42, 80-33, 07-36, 63-17, 43-18; आदित्य देशपांडे पराभूत वि.रिषभ ठक्कर 43-22, 27-71, 23-48, 27-83; योगेश लोहिया पुढे चाल वि.ईशप्रित चड्डा);
गट अ- पीवायसी वॅरियर्स वि.वि फायर बॉल 3-0(राजवर्धन जोशी वि.वि पियुष लिंबाड 38-30, 36-43, 36-26, 76-47; योगेश लोहीया वि.वि अमेय काळेकर 39-11, 54-35, 46-01; आदित्य देशपांडे वि.वि नितिन भोसले 40-19, 30-53, 09-33, 68-07, 34-10);
गट ब: डेक्कन रुकीज वि.वि.आरसीबीसी 2-1(श्रीवत्स शेवडे वि.वि.आशिष पटेल 32-36, 60-69, 46-17, 64-54, 37-22; राजेंद्र आढाव वि.वि.वेदांत दोशी 19-44, 53-34, 48-27, 63-39; अश्विन पळणीतकर पराभूत वि.जॉनी केन 12-33, 70-91, 27-40);
गट ब: पूना क्लब अ वि.वि. आरसीबीसी 3-0(सुराज राठी वि.वि जॉनी केन 32-21, 34-65, 33-20, 46-24; दिनेश महतानी वि.वि वेदांत दोशी 28-21, 50-39, 41-28; विग्नेश संघवी वि.वि आशिष पटेल 45-12, 80(67)-00, 37-25);
गट फ: कॉर्नर पॉकेट टायगर्स वि.वि.क्यू मास्टर्स अ 2-1(चिंतामणी जाधव पराभूत वि.सतीश कराड 41-07, 09-50, 26-33, 06-68; मनोज बारी वि.वि.