काल(३० ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात दुसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने ५ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांच्याकडून फलंदाजांनी चांगली कामगिरी केली.
अनुभवी मोहम्मद हाफिज आणि कर्णधार बाबर आझम यांच्या अर्धशतकांच्या मदतीने पाकिस्तानने रविवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात चार बाद १९५ धावा केल्या होत्या. बाबर (४४ चेंडूत ५६) आणि फखर जमान (२२ चेंडूत ३६) यांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करून पाकिस्तानला चांगली सुरुवात दिली. यानंतर हफीझने जबाबदारी चांगली पार पाडली आणि ३६ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. यादरम्यान बाबर आझमने भारतीय कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली आहे.
इंग्लंडविरुद्ध बाबर आझमने ५६ धावा केल्या आणि आता टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने १५०० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने या धावा ३९ डावात फलंदाजी करताना पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी – २०मध्ये सर्वात कमी डावात १५०० धावा पूर्ण करणारा जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली आणि अॅरोन फिंच यांनी हा पराक्रम केला आहे. विराट कोहली आणि अॅरोन फिंच यांनीही टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३९ डावांमध्ये १५०० धावा पूर्ण केल्या होत्या.
या सामन्यात बाबर आणि जमान यांनी वर्चस्व राखण्याचे धोरण सुरुवातीपासूनच स्वीकारले, ज्यामध्ये ते यशस्वी झाले. लेगस्पिनर आदिल रशीदने (३२ धावांत २ बाद) या दोन्ही फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर हाफिजने जबाबदारी चांगल्या प्रकारे हाताळली. त्याने तिसर्या विकेटसाठी शोएब मलिक (१४) सह ५० धावांची भागीदारी केली. यादरम्यान मोहम्मद हाफिजने २००० धावा पूर्ण केल्या.
मोहम्मद हाफिजने रचला विश्वविक्रम
इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये शानदार अर्धशतक झळकावून मोहम्मद हाफिजने इतिहास रचला. हाफिजने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या. यासह, क्रिकेटच्या या छोट्या प्रकारात हाफिज ५० बळी घेणारा आणि २००० धावा काढणारा पहिला खेळाडू ठरला. हाफिजने ३६ चेंडूत ६९ धावांची शानदार खेळी साकारली आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या सामन्यात इंग्लंडने १९६ धावांचे आव्हान डेव्हिड मलान(५४*) आणि मॉर्गन(६६) यांच्या अर्धशतकी खेळीच्या आणि जॉनी बेअरस्टोच्या आक्रमक ४४ धावांच्या खेळीच्या जोरावर १९.१ षटकात सहज पूर्ण केले आणि सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
-सीएसकेला सोडून रैना परतला भारतात, परंतू धोनी मात्र आला चाहत्यांच्या निशाण्यावर
-…आणि तेव्हा ७७ वर्षांचे प्रणव दा क्रिकेट खेळण्यात रमले
-माझी कसोटी कारकीर्द बळकट करायची आहे, आयपीएलमध्ये संधी मिळाल्यास ती बोनस ठरेल, पहा कोण म्हणतंय
ट्रेंडिंग लेख-
-तुटपूंज्या किंमत मिळूनही ‘हे’ ५ खेळाडू ठरले आयपीएलमध्ये सुपर डुपर हिट
-भारत सोडून या ५ देशाचे सर्वाधिक खेळाडू झाले आहेत आयपीएलमध्ये मालामाल