पीएमडीटीए-केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरिज मानांकन टेनिस २०१९ स्पर्धेत १५६ खेळाडू सहभागी

पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरीज मानांकन टेनिस 2019 स्पर्धेत एकूण 156 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.

ही स्पर्धा 14 ते 16 सप्टेंबर 2019 या कालावधीत डेक्कन जिमखाना क्लब येथील टेनिस कोर्टवर पार पडणार आहे.

ही स्पर्धा 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी गटात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.

You might also like

Leave A Reply