उझबेकिस्तानमध्ये पुढील महिन्यात होणार्या अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स एशियन स्पर्धेसाठी भारताच्या संघात 17 मुंबईकर खेळाडूंचा समावेश आहे. आशिया खंडातील एका सर्वोत्तम स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व मुंबईचे जिम्नॅस्ट हे लोकमान्य शिक्षण संस्थेच्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूरच्या अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतात.
यामध्ये 13 ते 17 वर्षे वयोगटातील यज्ञेश भोस्तेकर, समर्थ खन्नूकर, नमोह उनियाल आणि अश्विन गोसावी या चौघांची ज्युनियर संघात निवड झाली आहे. ऋतुजा जगदाळे, प्रीती एखंडे, आदित्य खसासे, आकाश गोसावी, आचल गुरव, आशुतोष रेणावकर, अक्षता ढोकळे, अर्ना पाटील, सोनाली बोराडे, नमन महावर, रितेश बोराडे, कुणाल कोठेकर आणि प्रशांत गोरे या मुंबईच्या जिम्नॅस्टचा 15 ते 28 वर्षे वयोगटात (सीनियर) समावेश आहे. वेगवेगळ्या शाळा आणि निवडक कंपन्यांमधून या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
सर्व जिम्नॅस्टना प्रशिक्षक राहुल ससाणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ससाणे हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. त्यांनी अनेक जागतिक स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. राहुल यांना योगेश पवार (शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि जज) आणि सुनील रणपिसे (आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते) या दोन प्रशिक्षकांचे सहकार्य लाभले आहे.
माफक आर्थिक पार्श्वभूमी आणि पायाभूत सुविधांचा अभाव यासारख्या अनेक अडथळ्यांवर आणि अडचणींवर मात करत एशियन स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केल्याने सर्व जिम्नॅस्ट्सची निवड प्रेरणादायी ठरते.तथापि, खेळाबद्दलची त्यांची आवड आणि देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा त्यांचा संकल्प अतूट आहे.
विद्यार्थ्यांची लढाऊ उपजत वृत्ती आणि सर्वोत्तम खेळ करण्याची वचनबद्धता पाहून खूप आनंद झाला. आम्ही कठोर प्रशिक्षण घेत आहोत आणि स्पर्धेसाठी सज्ज आहोत, असे लोकमान्य शिक्षण संस्था आणि शरद आचार्य क्रीडा केंद्र चेंबूरचे संचालक योगेश पवार यांनी सांगितले.
विशेष म्हणजे सर्व प्रशिक्षक हे गेली अनेक वर्षेकोणतेही शुल्क न घेता प्रशिक्षण देत आहेत. अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स एशियन स्पर्धा उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे 18 ते 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचे एकूण 46 जिम्नॅस्ट आणि सपोर्ट स्टाफ सहभागी होणार आहे.
हेही वाचा-
टीम इंडियाने कसली कंबर! विश्वचषकासाठी भारतीय संघाची जर्सी लाँच, पाहा काय-काय केलेत बदल
पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष विश्वजित कदम यांचा विश्वास