कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज आपल्या खेळण्याच्या शैलीतून ओळखले जातात. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या धैर्याची परिक्षा असते आणि बरेचसे फलंदाज या परिक्षेत उत्तीर्णसुद्धा होतात. अनेकदा कितीतरी फलंदाजानी कसोटी क्रिकेटमध्ये चांगला खेळ दाखवला आहे. ब्रायन लारा यांचा कसोटी सामन्याच्या एका डावात ४०० धावा बनवण्याचा विक्रम आहे. तसेच मैथ्यू हेडन यानेची सर्वोच्च वैयक्तिक संख्या (३८० धावा) प्रशंसनीय अशी राहिली आहे.
फलंदाजांच्या या चिवट आणि मोठ्या खेळींमुळे फलंदाजाीमुळे संघाची धावसंख्या सुद्धा तगडी बनते आणि त्यांना विरोधी संघावर दबाव बनवण्यात मदत मिळते. आपल्याकडे असे दोन संघ आहेत, ज्यांनी कसोटी सामन्यात खेळताना एका डावात ९०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. चला मग बघूया कोणते आहेत ते संघ?
यापैकी पहिला संघ आहे इंग्लंड– इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध हा पराक्रम केला होता. परंतु हा सामना ८३ वर्षांपूर्वी म्हणजे १९३८ मध्ये झाला होता. ओव्हलच्या मैदानात २० ते २४ ऑगस्टदरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरोधात ७ विकेटवर ९०३ धावा बनवल्या होत्या. लियोनार्ड हटन याने ३६४ धावा बनवून संघाला तगडी सुरुवात करून दिली होती आणि मौरिस लीलेंड याने नाबाद १८७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात २ डावात ऑस्ट्रेलिया संघाने अनुक्रमे २०१ आणि १२३ धावा केल्या होत्या. परिणामी इंग्लंडने ५७९ धावांनी हा सामना जिंकला होता.
तर दुसरा संघ आहे श्रीलंका– श्रीलंका संघाने हा पराक्रम भारताविरोधात केला होता. २ ऑगस्ट १९९७ मध्ये कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकाने भारत विरोधात ६ विकेटवर ९५२ रन बनवून विजय प्राप्त केला होता. यासह कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. या सामन्याक भारताने ८ विकेट्सवर ५३७ धावा बनवल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकाने ९५२ धावा फलकावल्या होत्या. श्रीलंकाच्या संघातून सनथ जयसूर्या याने ३४० धावा केल्या होत्या. तसेच रोशन महानमा याने २२५ धावांचे योगदान दिले होते. परंतु हा सामना अनिर्णित राहिला होता.
त्यावेळी भारताचा कर्णधार सचिन तेंडूलकर असून त्याने १४३ धावा बनवल्या होते. तसेच नवजोत सिंह सिध्दू आणि मोहम्मद अजहरूद्दीन यांनी शतकी पार खेळी केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
Kanpur Test: भारताच्या ‘या’ ३ चूका, न्यूझीलंडसाठी ठरल्या प्लस पॉईंट; नाहीतर खूप सोपा होता विजय
कर्णधार रहाणेच्या ‘या’ चूकीने सामना विजयाची गमावली संधी, ऑस्ट्रेलियन दिग्गज संतापला
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ‘या’ ३ खेळाडूंनी भारतीय संघात ठोकलीय दावेदारी, एकाने केलीत ९ शतके