एकोणीस वर्षांखालील (U-19) २००८ विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिलेला फलंदाज तन्मय श्रीवास्तवने शनिवारी (२४ ऑक्टोबर) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. सोबतच त्याने म्हटले की, त्याने नवीन स्वप्ने पाहिली आहेत. ज्यावर काम करण्यासाठी त्याच्याकडे मोठी महत्त्वाकांक्षा आहे. त्याने सोशल मीडियावरून आपल्या निवृत्तीची माहिती घोषणा केली. परंतु यावेळी त्याने आपल्या पुढील योजनांबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
कानपूरमध्ये जन्मलेल्या तन्मयने ट्वीट केले की, “माझ्या क्रिकेट कारकिर्दीचा निरोप घेण्याची ही वेळ आहे. आठवणी आणि मित्र बनवण्यासोबतच मी ज्यूनियर क्रिकेट, रणजी ट्रॉफी आणि १९ वर्षांखालील विश्वचषकात चांगली कामगिरी केली. यामुळे विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन मी संघासोबत आपल्या देशात परतलो.”
तन्मयने यासोबतच आपल्याला पाठिंबा देणाऱ्या प्रशिक्षक, उत्तर प्रदेशचे चाहते, आई- वडील आणि पत्नीलाही धन्यवाद दिला. तो म्हणाला, “मला वाटते की, मी मैदानाच्या आत आणि बाहेर क्रिकेटशी निगडीत अशा आठवणी बनवल्या आहेत, ज्या आयुष्यभर माझ्यासोबत जोडल्या राहतील. मी नवीन स्वप्ने पाहिली आहेत. आणि त्यासाठी मोठी महत्त्वाकांक्षा आहे. आता पुढील आयुष्याकडे वळण्याची वेळ आहे.”
It’s time to bid adeu to my cricketing playing career! I’ve built memories, made friends, achieved the best I could in these years playing Junior Cricket, Ranji Trophy and most importantly being a good performer in U-19 World Cup,2008 and bringing the cup home with the team!! pic.twitter.com/gYCvPGNV5g
— Tanmay Srivastava (@srivastavtanmay) October 24, 2020
सन २००८ साली मलेशिया येथे खेळण्यात आलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात तन्मयने २६२ धावा केल्या होत्या. यासोबतच तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यायावेळी भारतीय संघाचे नेतृत्त्व विराट कोहलीने केले होते.
तन्मय श्रीवास्तवने अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शानदार खेळी केली होती. फायनलमध्ये तन्मयने ४६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. कमी धावांच्या या मॅचमध्ये तन्मयची हीच खेळी महत्त्वाची ठरली होती. त्याच्या या खेळीमुळे भारताने १२ धावांनी विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला होता.
त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९० सामने खेळले. यात त्याने ३४.३९ च्या सरासरीने १० शतके आणि २७ अर्धशतकांच्या मदतीने ४९१८ धावा केल्या. याव्यतिरिक्त त्याने आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब, डेक्कन चार्जर्स आणि कोची टस्कर्स या संघांचेही प्रतिनिधित्व केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘मला जाऊ द्या ना घरी’ लावणीवर विराट कोहलीचा जबरदस्त डान्स; पाहा भन्नाट मीम्स
-एकच नंबर! पृथ्वी शाॅने मारलेला खणखणीत षटकार पाहून विराट कोहली अचंबित, पाहा व्हिडिओ
-‘त्या’ खेळाडूला दिलेल्या जीवदानामुळेच आम्ही सामना गमावला – विराट कोहली
ट्रेंडिंग लेख-
-चेन्नईचे तारणहार बनण्यास तयार आहेत ४ युवा प्रतिभावान खेळाडू ; मुंबईविरुद्ध मिळणार संधी?
-‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
-“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला