क्रिकेट जगतात सर्वाधिक विक्रम होतात. हा असा खेळ आहे जिथे प्रत्येक चेंडूनंतर काहीतरी विक्रम होतो. त्यातही हा खेळ जर ५ दिवसांच्या अर्थात कसोटी प्रकारातील असेल तर विक्रमांची अक्षरशः रांग असते.
क्रिकेटच्या याच प्रकारात एक असा विक्रम खास विक्रम आहे ज्यातील नावे वाचून आपण अवाक व्हाल. क्रिकेटमध्ये असे ५ कसोटीपटू आहेत ज्यांनी कसोटीमध्ये शतकांपेक्षा जास्त वेळा ० धावेवर बाद झाले आहेत. 6 established batsmen who scored more Test ducks than centuries.
#१ इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज माइक गॅटिंगने ७९ कसोटी सामन्यात १० शतके केली तर १६ वेळा तो ‘०’ धावांवर बाद झाला.
#२ इंग्लंडचाच दुसरा दिग्गज कसोटीपटू माइक अथरटन याचीही काही वेगळी अवस्था नाही. त्याने तब्बल १९९ कसोटी सामने खेळले. त्यात तो १६ वेळा शतकी खेळी करू शकला तर २० वेळा ‘०’ धावांवर बाद झाला.
#३ श्रीलंकेचा माजी कर्णधार मारवान आटापटूने ९० कसोटी सामन्यात १६ शतके केली आणि २२ वेळा तो ० धावेवर बाद झाला.
#४ त्याच देशाच्या सनाथ जयसूर्याचीही काही वेगळी परिस्थिती नाही. त्याने ११० कसोटी सामने खेळताना १४ शतके केली तर १५वेळा ० धावेवर बाद झाला.
#५ या यादीतील एक खास नाव म्हणजे न्युझीलँडचा माजी कर्णधार ब्रेंडॉन मॅक्क्युलम. त्याने १०१ कसोटी सामन्यात १२ शतके केली आहेत तर १४ वेळा तो ० धावसंख्येवर बाद झाला.
या यादीत एकमेव भारतीय फलदांज:
या यादीत भारताचे एकमेव खेळाडू आहेत. ते म्हणजे मोहिंदर अमरनाथ. त्यांनी ६९ कसोटीत ११ शतके करणारे अमरनाथ १२ वेळा ० धावेवर बाद झाले.
महा स्पोर्ट्स टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@MahaSports) जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी मिळवा.
२०११ विश्वचषक विशेष-
–धोनीने ज्या बॅटने षटकार मारत विश्वचषक जिंकला तिला मिळाली भलतीच किंमत
–२०११ विश्वचषक विजयातील केवळ एक हिरो आहे सध्याच्या टीम इंडियाचा सदस्य
–तो षटकार, ते मैदान आणि तो इतिहास….
–आठवण – भारताच्या विश्वविजयाची
–गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार, २०११ ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक
–का झाला होता २०११च्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन वेळा टाॅस?