fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारतातील या शहरांमध्ये होणार २०२३ चा हॉकी विश्वचषक

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बुधवारी जाहीर केले की 2023 पुरूष हॉकी विश्वचषक भारतातील भुवनेश्वर आणि राउरकेला या शहरात होईल.

या महिन्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) 2023 विश्वचषकासाठी भारताची निवड केल्यानंतर भारत सलग दुसऱ्यांदा पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यास सज्ज झाला आहे.

ही स्पर्धा 2023 मध्ये 13 ते 29 जानेवारी दरम्यान होईल.

2018 च्या विश्वचषकाच्या सुरुवातीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या वर्धापन दिनानिमित्त 2023 चा विश्वचषक भुवनेश्वर आणि राउरकेला येथे होईल ही पटनायक यांनी घोषणा केली.

ते म्हणाले, “आम्ही 2018 च्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते आणि मी जाहीर करू इच्छितो की 2023 हॉकी विश्वचषक पुन्हा भुवनेश्वर आणि राउरकेला येथे होईल.”

भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या सोहळ्यास आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा, हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद, ओडिशाचे क्रीडामंत्री तुषारकांती बेहरा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

भुवनेश्वरने मागील काही वर्षात मोठे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे, ज्यात 2017 एशियन अ‍ॅथलेटिक्स चँम्पियनशिप, 2017 एफआयएच हॉकी वर्ल्ड लीग फायनल्स, 2019 मधील एफआयएच मेन्स सिरिज फायनल्स आणि नुकत्याच पार पडलेल्या एफआयएच हॉकी ऑलिम्पिक क्वालिफायर या स्पर्धांचा समावेश आहे.

त्याचबरोबर 2020मध्ये होणाऱ्या 17 वर्षीय फिफा महिला विश्वचषकासाठी भुवनेश्वर हे देखील एक ठिकाण आहे.

You might also like