-अनिल भोईर
दुबई येथे २२ जून पासून सुरू झालेल्या कबड्डी मास्टर्स आंतराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पर्धेतील दोन अपराजित संघ पोहचले होते. अंतिम फेरीत इराण समोर विश्वविजेता भारताचा कडवा आव्हान होता.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने अंगण निवडून सामन्याला सुरुवात झाली. प्रदीप नरवालच्या जागी दीपक हुडाला पहिल्या सातमध्ये स्थान देण्यात आले होते. भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड मिळवली. सातव्या मिनिटाला इराणवर लोन टाकत आघाडी भक्कम केली.
अजय ठाकूर, रिशांक व मोनू गोयातने सुरुवातीपासून आक्रमक चढाय्या करत गुण मिळवले. सुरजीत व गिरीशने पकडीमध्ये गुण मिळवले. पण इराणने मोनू गोयातची सुपर कॅच आणि चढाईत गुण मिळवत सामन्यात चुरस आणली. मध्यंतरापर्यत भारताकडे १८-११ अशी सात गुणांची आघाडी होती
मध्यंतरा नंतर तिसऱ्या मिनिटाला इराणवर दुसरा लोन टाकत भारताने २४-१२ अशी आघाडी मिळवली. भारताने चढाई आणि पकडीमध्ये दुहेरी खेळ केला. भारताकडून सांघिक खेळ बघायला मिळाला.
अंतिम सामनामध्ये शेवटची ९ मिनिट शिल्लक असताना भारताकडे ३ खेळाडू अंगणात होते. मोहित चिल्लरने जबरदस्त सुपरकॅच करत भारतावर लोन होण्यापासून दूर केलं. सुरजीतने आपल्या अनुभवाचा उपयोग करत हाय फाय करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
विश्वविजेते भारताने इराणवर ४४-२६ असा एकतर्फी विजय मिळवत कबड्डी मास्टर्स स्पर्धेचा विजेतेपद पटकावले. इराण कडून चढाईमध्ये मोहम्मद नबी तर पकडीमध्ये हादीकडून चांगला खेळ बघायला मिळाला. इराण जिंकून देण्यासाठी त्याचे प्रयत्न अपयशी ठरले.
अंतिम सामन्यात भारताकडून चढाईत २० गुण तर पकडीमध्ये १८ गुण असा दुहेरी खेळ बघायला मिळायला. कर्णधार अजय ठाकुरने चढाईत ९ गुण मिळवले. पकडी मध्ये सुरजितने सर्वाधिक ६ गुण मिळवले. मोनू गोयातने चढाईत ६ गुण तर गिरीश इरनकने पकडीत ३ गुण मिळवले. अंतिम सामन्यात भारताकडून सांघिक खेळ झाला.
महत्त्वाच्या बातम्या:
-भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचे रौप्यपदक; पेनल्टी शुटआऊटमध्ये आॅस्ट्रेलियाने मारली…
-फिफा विश्वचषक: डेन्मार्कला धूळ चारत क्रोएशियाचा उपांत्य…
–महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंना गरज आहे ती फक्त एका संधीची..