fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

नववर्षातील असाही एक योगायोग जो आहे केवळ सचिन कोहलीच्या नावावर

मुंबई | २०१८ वर्षाखेरीस भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली कसोटी तसेच वन-डे क्रमवारीत अव्वल स्थानी राहिला आहे. विराटने २०१८मध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीचे हे फळ आहे.

विराटचे सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत ९३१ गुण असून दुसऱ्या स्थानावरील केन विलियमसनचे ८९७ गुण आहेत. तर वन-डे क्रमवारीत विराटचे ८९९ गुण असून दुसऱ्या क्रमांकावरील रोहित शर्माचे ८७१ गुण आहेत.

Photo Courtesy: Twitter/ ICC

यामुळे एक खास योगायोग जूळून आला आहे. १ जानेवरी १९९९ रोजी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आयसीसी कसोटी आणि वन-डे क्रमवारीत अव्वल स्थानी होता. आजपर्यंत केवळ दोनच वेळा आयसीसी क्रमवारीत असे भारतीय खेळाडूंसोबत झाले आहे.

विशेष म्हणजे यावर्षी भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल असून वन-डे गोलंदाजीच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी आहे.

यापुर्वी केवळ ६ वेळा भारतीय खेळाडू १ जानेवारी रोजी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी राहिले आहे. त्यात सचिन तेंडूलकर (१९९५, १९९९, २००१), राहुल द्रविड (२००५), गौतम गंभीर (२०१०) आणि विराट कोहली (२०१९) यांचा समावेश आहे.

Anil Kumble Sachin Tendulkar Srishant Rahul Dravid Zaheer Khan VVS Laxman

२०१० नंबर तब्बल ९ वर्षांनी भारतीय खेळाडू १ जानेवारी रोजी अव्वल स्थानी आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

२०१८मध्ये वनडेत धावांचा रतिब घालणारे ५ फलंदाज

२०१८ मध्ये कसोटी क्रिकेट गाजवणारे ५ गोलंदाज

२०१८ वर्षांत कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज

You might also like