एसएसजी आणि दुर्गामाता स्पोर्ट्स यांनी मुंबई शहर कबड्डी असो.आयोजित व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत कुमार गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली, तर शिवशक्ती-अ, महर्षी दयानंद, चंद्रोदय, अमरहिंद यांनी किशोरी गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
वडाळा येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या पटांगणावर सुरू असलेल्या कुमार गटाच्या उपांत्य सामन्यात एस एस जी ने जय दत्तगुरुचा ५०-११असा धुव्वा उडवित आरामात अंतिम फेरी गाठली.
विश्रांतीला ३२-०७अशी एस एस जी कडे आघाडी होती. या सामन्यात धारदार आक्रमण व भक्कम बचावाचा खेळ करीत आपणच या स्पर्धेत विजेतेपदाचे प्रमुख दावेदार आहोत हे एस एस जी ने दाखवून दिले. ओमकार थोर, ओमकार सांजेकर यांच्या अष्टपैलू खेळाला या विजयाचे श्रेय जाते. जय दत्तगुरूंच्या दीपेश चव्हाण यांने बऱ्यापैकी लढत दिली.
दुसऱ्या सामन्यात दुर्गामाताने विकासचे आव्हान २३-१३असे संपुष्टात आले. मध्यांतराला १५-०५अशी आघाडी घेणाऱ्या दुर्गामाताने नंतर मात्र सावध खेळ करीत हा विजय साकारला. प्रथमेश पालांडे, करणं कदम यांच्या चतुरस्त्र खेळामुळे हा विजय शक्य झाला. विकासाचा आदिनाथ धावले एकाकी लढला. या अगोदर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एस एस जी ने भवानीमाताचा ४१-२९, जय दत्तगुरुने विजय बजरंग व्यायाम शाळेचा ४०-१७, दुर्गामाताने बंड्या मारुतीला ४४-२८, तर विकासाने चुरशीच्या लढतीत सिध्दीप्रभाला ३२-२९ असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली होती.
किशोरी गटाच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात शिवशक्ती अ ने आर्य मंडळाला ६०-५६ असे पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात महर्षी दयानंदने अमर भारतला ४१-१८असे नमविले. चंद्रोदयने विश्वशांतीचा ५३-०३असा धुव्वा उडविला. शेवटच्या सामन्यात अमरहिंदने गोलफादेवीला ७२-३३ असे बुकलून काढले. या विजयी संघांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली.
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट कोहलीप्रमाणेच हे ३ प्रो-कबड्डी स्टार ५ हंगामात खेळले एकाच संघाकडून
–प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली
–या दिग्गज माजी खेळाडूची पुणेरी पलटणच्या प्रशिक्षकपदी निवड
–महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंवर लागु शकते प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली
–संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध
–आयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम
–कबड्डी- ई भास्करन तमिल थलाइवाजचे मुख्य प्रशिक्षक
–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम