आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिविलियर्सने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. हा खेळाडू दक्षिण आफ्रिकेकडून तब्बल १४ वर्ष क्रिकेट खेळला.
त्याने २००४ला कसोटी, २००५ला वनडे आणि २००६ला टी२० पदार्पण केले होते.
२०००पुर्वी पदार्पण केलेल्या आशिष नेहराने क्रिकेटमधून २०१७मध्ये संन्यास घेतला. याबरोबर आता असे ६ खेळाडू क्रिकेट जगतात राहिले आहेत ज्यांचे पदार्पण २०००मध्ये पुर्वी झाले आहे परंतु ते आजही क्रिकेट खेळत आहेत किंवा राष्ट्रीय संघात परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
यात सर्वात आधी आंतरराष्ट्रीय पदार्पण हे हरभजन सिंगचे झाले आहे. हरभजन सिंगचे पदार्पण २५ मार्च १९९८ रोजी ऑस्ट्रेलिया संघाच्या विरुद्ध झाले आहे. हरभजन सिंगला मार्च २०१६ नंतर राष्ट्रीय संघात कोणत्याच प्रकारात स्थान देण्यात आले नाही.
या काळात पदार्पण झालेल्या खेळाडूंपैकी रंगाना हेराथ श्रीलंकेच्या कसोटी संघाचा पूर्णवेळ सदस्य आहे. तो फेब्रुवारी २०१८मध्ये कसोटी सामना खेळला आहे.
युवराज सिंग जून २०१७मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला आहे तर युवराजने ज्या महिन्यात पदार्पण केले त्याच महिन्यात पदार्पण करणारा शोएब मलिक पाकिस्तानच्या वनडे आणि टी२० संघाचा पूर्णवेळ सदस्य आहे.
मार्लन सॅम्युएल आणि ख्रिस गेल हे २५ मार्च २०१८ला विंडीज संघाकडून वनडे सामना खेळले आहेत.
अन्य खेळाडू ज्यांनी या काळात पदार्पण केले-
हरभजन सिंग- २५ मार्च १९९८ (वय- ३७)
ख्रिस गेल- ११ सप्टेंबर १९९९ (वय- ३८)
रंगाना हेराथ- २२ सप्टेंबर १९९९ (वय- ४०)
युवराज सिंग- ०३ ऑक्टोबर २००० (वय- ३६)
शोएब मालिक -१४ ऑक्टोबर १९९९ (वय- ३६)
मार्लन सॅम्युएल- ०४ ऑक्टोबर २००० (वय- ३७)
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलमध्ये नाकारले, या लीगने केले स्मिथला आपले
–कसोटीपटू चेतेश्वर पुजाराची वनडेत तुफानी फटकेबाजी
–सलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम
–प्रिय एबी, क्रिकेटला परिपुर्ण बनवल्याबद्दल थँक्यू !
–चेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल!