fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

शिक्षणासाठी सोडलं होत क्रिकेट, आज ठरला सर्वात महागडा खेळाडू

आयपीएल 2019चा लिलाव आज(18 डिसेंबर) जयपूरमध्ये सुरु आहे. या लिलावात अनेक आश्चर्यकारक निर्णय संघांनी घेतले आहेत. यातील सर्वात चकीत करणारी बोली युवा क्रिकेटपटू वरुण चक्रवर्थीवर लागली आहे.

त्याला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 8 कोटी 40 लाख रुपयांची बोली लावत संघात सामील करुन घेतले आहे. त्याची मुळ किंमत 20 लाख होती.

वयाच्या 13 व्या वर्षी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून क्रिकेटला सुरुवात केलेल्या वरुणने नंतर आर्किटेक्चरमध्ये शिक्षण घेण्यासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला. त्यानंतर त्याला घुडघ्याची दुखापत झाली त्यामुळे त्याने फिरकी गोलंदाजी करणे पसंत केले.

तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडू संघाकडून खेळत असून त्याने याचवर्षी रणजी ट्रॉफीमध्येही पदार्पण केले आहे. त्याने हैद्राबाद विरुद्ध रणजी सामना खेळताना 1 विकेट घेतली होती.

तसेच त्याने अ दर्जाचे 9 सामने खेळले असून यात त्याने 22 विकेट्स घेतल्या आहेत. या सर्व विकेट्स त्याने यावर्षीच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत घेतल्या होत्या. तसेच तो यावर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.

त्याचबरोबर त्याने तमिळनाडू प्रिमियर लीगमध्ये उत्तम कामगिरी झाली आहे. त्याने या स्पर्धेत 9 विकेट्स घेतल्या होत्या.

आत्तापर्यंत यावर्षीच्या आयपीएल लिलावात 8 कोटी 40 लाख रुपये जयदेव उनाडकटला मिळाले आहेत. त्यामुळे या वर्षीच्या आयपीएल लिलावात आत्तापर्यंत सर्वात महागडे खेळाडू उनाडकट आणि वरुण चक्रवर्थी ठरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

कोहली-पेन वादाबद्दल बीसीसीआयने केला मोठा खुलासा

Video: इशांत शर्मासाठी ‘पार्ट-टाइम अंपायर’ झाला नॅथन लायन

ऑस्ट्रेलियन भूमीत टीम इंडियाविरुद्ध हा गोलंदाज ठरला सर्वात यशस्वी

कोहलीचा ‘तो’ निर्णय चूकला आणि टीम इंडियाने सामना गमावला…

You might also like