क्रिकेटमध्ये बहुतेक चाहत्यांना फलंदाजांचे मोठे फटाके पहायला आवडतात. फलंदाजही त्यांना निराश करत नाहीत आणि मैदानावर शानदार प्रदर्शन करण्यात मागे राहात नाहीत. ते चौकार-षटकारांची आतिषबाजी करून प्रेक्षकांना खुश करतात. खरंतर वनडे क्रिकेट आल्यानंतर खऱ्या अर्थाने क्रिकेट जगताला वेगाने खेळण्याची ओळख झाली. त्यानतंर टी२० क्रिकेटने त्यापुढील पायरी गाठक आक्रमक आणि स्पोटक फलंदाजीची काय असते हे सर्वांना दाखवून दिले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक दिग्गज फलंदाज आहेत ज्यांची स्पोटक फलंदाजी पाहून प्रेक्षक भारावून जातात. जेव्हा असे दिग्गज फलंदाज धुवाधार फलंदाजी करतात, तेव्हा समोरच्या संघातील कर्णधारांना रणनीती आणि क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करावे लागतात.
या लेखात अशाच तीन फलंदाजांचा उल्लेख केला आहे ज्यांनी ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक ठोकले आहे.
ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये या ३ फलंदाजांनी १२ चेंडूत ठोकली अर्धशतके-
युवराज सिंग (Yuvraj Singh)ट
युवराज सिंग या भारतीय खेळाडूने २००७ च्या टी२० विश्वचषकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या सलग ६ चेंडूंवर ६ षटकार ठोकले होते. युवराज सिंगने या सामन्यात १२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. या खेळीत युवराज सिंगने एकूण १६ चेंडूत ५८ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये ७ शानदार षटकारांचा समावेश होता. भारतीय संघाने हा सामना १८ धावांनी जिंकला.
ख्रिस गेल (Chris Gayle)
बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळताना वेस्ट इंडीजचा अनुभवी खेळाडू ख्रिस गेलने एडिलेड स्ट्राइकर्सविरूद्ध १२ चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले होते. या खेळीत ख्रिस गेलने ७ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने १७ चेंडूत ५६ धावा केल्या. दुर्दैवाने ख्रिस गेलच्या संघाला हा सामना जिंकता आला नाही.
हजरतुल्ला जाजाई (Hazratullah Jajai)
हजरतुल्ला जाजाई या खेळाडूने अफगाणिस्तान प्रीमियर लीगमध्ये सहा चेंडूत सलग ६ षटकार ठोकून १२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. काबुल ज्वाननकडून खेळत असताना जाजईने बल्ख लीजेंड्स विरूद्ध १७ चेंडूत ६२ धावा फटकावल्या. या उत्कृष्ट खेळीनंतरही त्याच्या संघाला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
ट्रेंडिंग लेख –
कसोटी क्रिकेटमधील सर्वात धीमी खेळी करणारे ५ फलंदाज; एबी डिव्हिलियर्सचाही आहे समावेश
आयपीएलमधील धुव्वांदार फलंदाज व त्यांची आवडती मैदान जिथं ते गोलंदाजांना देत नाहीत सुट्टी
आयपीएलमधील ५ धाकड फलंदाज, ज्यांनी एक नव्हे तर २ वेगवेगळ्या संघांकडून ठोकली आहेत शतकं
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! यावर्षी नाही होणार आयपीएल लिलाव, ही आहेत कारणे
मुलगा स्टुअर्ट ब्रॉडने केली मोठी चूक, वडील ख्रिस ब्रॉडने सुनावली ‘बाप’ शिक्षा
बिली बाऊडेनने आपल्या खास शैलीत बोट उंचावले…आणि वॉर्नचं नाव क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीलं गेलं