fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कॅप्टन वगैरे तुमच्या देशात! आयपीएलमध्ये फक्त खेळाडू म्हणून खेळलेले दिग्गज

September 3, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ IPL

Photo Courtesy: Twitter/ IPL


कोणत्याही क्रिकेट प्रकारात देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळणं हि एक अत्यंत प्रतिष्ठेचीच गोष्ट असते. मग ते क्रिकेटसारख्या खेळात असल्यास अजूनच चमकून दिसतं. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं म्हणजेच तुम्ही खेळत असलेल्या प्रत्येक टीमचे तुम्ही कर्णधार असाल असं नाही, आणि आयपीएलच्या बाबतीत तर नाहीच नाही.

आयपीएलमध्ये आपण अनेक धुरंधर आणि दर्जेदार कर्णधार पाहिले आहेत. पण या लेखात आपण अशा खेळाडूंची माहिती घेणार आहोत ज्यांनी देशाचे कर्णधारपद भूषवले परंतु आयपीएलमध्ये कधीही त्यांचा संघाचे प्रतिनिधित्व केलेले नाही.

१) ए.बी.डीव्हिलिअर्स

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए.बी.डीव्हिलिअर्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये १५०हून अधिक सामने खेळलेले आहेत. आणि तो जिथे जातो तिथे चाहत्यांच्या गराड्यात असतो. रॉयल चलेंजर बेंगलोरचा तो एक हुकुमी एक्का आहे. पण आधी दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून व आता रॉयल चलेंजर बेंगलोरकडून खेळताना त्याने कधीही कर्णधाराची भूमिका निभावलेली नाही.

ए.बी.डीव्हिलिअर्सने आयपीएलमध्ये ४ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. त्यामध्ये ३ शतके आणि तब्बल ३३ अर्धशतकांचा समावेश आहे.

त्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही डीव्हिलिअर्सने चमकदार कामगिरी केलेली आहे. त्याने देशासाठी खेळताना ४०हुन जास्त शतके आणि १००हुन जास्त अर्धशतके केलेली आहेत.

२) लसिथ मलिंगा

मुंबई इंडियन्सचा अविभाज्य घटक असलेला मलिंगा हा आपल्या अनोख्या शैलीसाठी आणि यॉर्केर साठी ओळखला जातो. त्याच्या नावावर अत्यंत आगळेवेगळे विक्रमही आहेत. मलिंगा हा एकमेव असा गोलंदाज आहे ज्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ३ वेळा हॅट्रिक घेण्याची किमया साधली आहे. 

तसेच सलग ४ विकेट घेण्याचा विक्रम त्याने २ वेळा केला आहे.  सध्या तो श्रीलंकन टी-ट्वेंटी संघाचा कर्णधार आहे.

आयपीएलमध्ये मुंबईकडून १७० सामने खेळताना त्याने १२२ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व प्रकारच्या सामन्यात त्याने ५००हुन अधिक विकेट्स घेतलेली आहेत.

अशा या दिग्गज खेळाडूने आयपीएलमध्ये मात्र एकदाही मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवलेले नाही.

३) ख्रिस गेल

आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक आणि आयपीएलमधील सर्वाधिक वैयक्तिक धावा तसेच इतरही अनेक विक्रम नावावर असणाऱ्या ख्रिस गेलने अद्याप आयपीएलमध्ये कोणत्याही संघाची कर्णधारपदाची धुरा सांभाळलेली नाही. मग ती कोलकता, बेंगळूरूची टीम असो अथवा किंग्स इलेवन पंजाब. 

वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू आणि पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी असणाऱ्या गेलने वेस्ट इंडीजचे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये ९० सामन्यात प्रतिनिधित्व केलेले आहे.

मलिंगासारखीच गेलचीही आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही टीमचे कर्णधारपद न मिळाल्याचे आश्चर्य वाटते.

१२५ आयपीएल सामन्यात गेलने ४०+ च्या सरासरीने ४४८४ धावा केलेल्या आहेत.

गेलची २०१३ सालची १७५ धावांची घणाघाती खेळी ही अजूनही आयपीएल व आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वोच्च खेळी आहे. आणि याखेळीत त्याने केवळ ३० चेंडूत शतक केल्याने टी-ट्वेंटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचाही विक्रम त्याचा नावावर आहे.


Previous Post

जेव्हा पोरं बारावी शिकत असतात, त्या वयात आयपीएलमध्ये खणखणीत शतक करणारे क्रिकेटर

Next Post

लिलावात न विकले गेलेले ‘हे’ ५ खेळाडू खेळू शकतात आयपीएल २०२०

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCIdomestic
क्रिकेट

महिपाल लोमरोलच्या विस्फोटक खेळीमुळे राजस्थानची बिहारचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक

January 28, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
क्रिकेट

आयपीएल लिलावात सहभागी होण्याआधी संघसदस्यांना ‘ही’ गोष्ट करणे अनिवार्य

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम; विराट व रोहित आहेत ‘या’ क्रमांकावर

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/Sunrisers
क्रिकेट

शुभमंगल सावधान! अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन भारतीय संघांमध्येच रंगणार सामने

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

टीम इंडिया थँक्यू! ‘हा’ फोटो शेअर करत नॅथन लायनने मानले आभार

January 28, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

लिलावात न विकले गेलेले 'हे' ५ खेळाडू खेळू शकतात आयपीएल २०२०

Photo Courtesy: Twitter/CricketWorldCup & BCCI

आयपीएल २०२० मध्ये परदेशी क्रिकेटर नसल्यास या ५ युवा भारतीय खेळाडूंना होईल जोरदार फायदा

Photo Courtesy: Twitter/ IPL & Mipaltan

आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.