क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक खेळाडूला एक ना एक दिवस निवृत्त व्हावे लागते. तसेच क्रिकेट खेळाडूही क्रिकेटमधून निवृत्त होऊन आपला दुसऱ्या कारकिर्दीचा डाव सुरु करतात. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी निवृत्त होऊन सर्वांना चकित केले.
खरतर निवृत्तीनंतर खेळाडू वेगवेगळ्या गोष्टी करतो. जसे की, गौतम गंभीरने राजकारणामध्ये प्रवेश केला. तर बहुतेक क्रिकेटपटू समालोचक किंवा क्रिकेट तज्ञ म्हणूनही काम करताना दिसतात.
आता माजी कर्णधार एमएस धोनी निवृत्त तो आता पुढे काय करेल, कोणते क्षेत्र निवडेल यांच्याकडे सर्व चाहत्यांची नजर असेल. म्हणूनच या लेखाच्या एमएस धोनी कोणत्या ५ क्षेत्रात आपला हात आजमावू शकेल हे बघूया.
५. ठेवू शकतो राजकीय कारकीर्दीत पाऊल-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आता निवृत्त झाला आहे. मग तो पुढे तो कोणता डाव सुरु करेल? असा सर्वच चात्यांना प्रश्न पडला असेल. काही गोष्टीकडे बघता एमएस इतर काही क्रिकेटर्सप्रमाणेच राजकारणात प्रवेश करू शकतो.
धोनीचा चाहता वर्ग हे यामागील सर्वात मोठे कारण असू शकते. कारण म्हणजे भविष्यात त्यांच्यासाठी ते मतदार म्हणून काम करू शकतात. माहीने जरी कोणत्याही पक्षातून निवडणुकीला उभा राहिला तर त्याचे चाहते त्याला नक्की मत देऊन विजयी करतील. परंतु माही अत्यंत यशस्वी कर्णधार असला, तरी राजकारण आणि क्रिकेट यांमध्ये खूप फरक आहे.
४.
एमएस धोनी एक हुशार कर्णधार होता. त्याने कठीण प्रसंगी घेतलेल्या निर्णयाचा भारताला नेहमीच फायदा झाला. यामुळेच तो व्यवसायामध्ये उतरू शकतो.
आधीच धोनी अनेक ठिकाणी व्यवसाय करीत आहे. पण आता तो संपूर्ण वेळ व्यवसाय करू शकतो आणि त्यात तो १०० टक्के देऊ शकतो. हे निश्चित आहे की जर एमएसने या व्यवसायात प्रवेश केला तर तो नक्कीच एक मोठा व्यवसायिक बनून देशाचे नाव मोठे करू शकतो. तो सध्या स्पोर्ट्सफिट प्रायव्हेट लिमिटेड जिमचा मालक आहे. ज्याच्या फ्रँचायझी भारतातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या शहरात आहेत.
याशिवाय अभिषेक बच्चनसमवेत माही चेन्नईन एफसी फुटबॉल संघाचा सह संघ मालक देखील आहे. तसेच हॉकी इंडियन लीगमधील रांची रेज टीमचा सह-संघमालक आहे. याशिवाय माही ड्रीम इलेव्हन, खटा बुक, पेपसी, गोडॅडी, टाइमएक्स, टीव्हीएस यासारख्या मोठ्या ब्रँडचा ब्रँड अॅम्बेसेडरही आहे. आता जर माही आपल्या व्यवसायाचा वापर करुन पुढे गेला तर तो खरोखर यशस्वी उद्योगपती बनू शकतो.
३. सेंद्रिय शेती
कोरोना कालावधीत धोनीचे बरेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. त्यातील बरेचसे फोटो आणि व्हिडिओ मध्ये धोनी ट्रॅक्टर चालविताना दिसला. यानंतर असे समोर आले की, एमएस सेंद्रिय शेती करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी त्याने ८ लाखांचे ट्रॅक्टरही खरेदी केले आहे.
धोनी शेतकर्यांच्या मदतीची योजना तयार करीत असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. तसेच, असेही वृत्त आले आहे की शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी न्यू ग्लोबल नावाचा नवीन ब्रँड आणत आहेत.
त्याअंतर्गत दुर्गम भागातील शेतकऱ्यांना कमी किंमतीत खते उपलब्ध करुन देण्याची संकल्पना आहे. यासाठी धोनीची कंपनी राज्य सरकारांशी चर्चा करीत आहे.
२. कोचिंग करीअर
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी १६ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आणि देशाला ३ आयसीसीचे खिताबही दिले. एमएस हा केवळ भारताचाच नाही तर संपूर्ण जगाचा एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या तीनही ट्रॉफी आपल्या राष्ट्रीय संघाला जिंकून दिल्या आहेत.
अशा परिस्थितीत जर धोनीला निवृत्तीनंतर क्रिकेटशी जोडून राहायचं असेल तर प्रशिक्षण क्षेत्राशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. जर एमएसने कोचिंग करण्याचा निर्णय घेतला तर ते भारतासाठी फायदेशीर ठरेल.
रवी शास्त्री यांच्याकडे सध्या भारतासाठी प्रशिक्षणाची जबाबदारी आहे पण २०२१ टी-२० विश्वचषकानंतर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येईल. अशा परिस्थितीत जर धोनीची इच्छा असेल तर बीसीसीआय नक्कीच त्याला संघाचे प्रशिक्षक करण्याची जबाबदारी सोपवू शकते.
१. सैन्यात स्वत: ला समर्पित करू शकतो
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनीबद्दल सर्वांना माहिती आहे की धोनीचं पहिलं प्रेम आर्मी आहे. माहीने १६ वर्षे क्रिकेटच्या माध्यमातून देशाची सेवा केली. पण आता एमएसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे.
२०११ विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीला ‘लेफ्टनंट कर्नल’ ही मानद पदवी देण्यात आली. एमएस २०१९ विश्वचषकानंतर देखील काही काळासाठी तो सैन्यात दाखल झाला होता. क्रिकेटमुळे तो सैन्यावर इतका लक्ष केंद्रित करू शकला नसला, तरी आता धोनी लष्करात त्याचा पूर्ण वेळ देण्यासाठी मोकळा आहे.