बांगलादेश महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज संजीदा इस्लाम ही सध्या खूप चर्चेत आहे. तिने तिच्या लग्नाचे एकदम हटके फोटोशूट केल्यामुळे सर्वत्र तिची चर्चा होत आहे. संजीदाने तिच्या लग्नाचे फोटोशूट एका मैदानावर केले आहे. ज्यात ती साडी घालून पारंपारिक अंदाजात सजलेली दिसत आहे आणि तिने हातात बॅट पकडून फलंदाजीचे वेगवेगळे पोज देत फोटो काढले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
२४ वर्षीय संजीदाचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले आहे. तिचा पती मिम मोसद्दक हा रंगपूर प्रथम श्रेणी क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आहे.
१ एप्रिल १९९६ रोजी बांगलादेशच्या रंगपूर शहरात संजीदाचा जन्म झाला होता. तिला एक भाऊ आणि बहीण आहे. संजीदाने शालेय वयापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. पुढे २००९ साली तिला बांगलादेश स्पोर्ट्स एज्युकेशन फाउंडेशनमध्ये स्थान मिळाले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.
https://www.instagram.com/p/CGkLjifHlIO/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CGlilcpnaqx/?utm_source=ig_web_button_share_sheet
अखेर २०१२ साली तिने बांगलादेश महिला टी२० संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढे २०१४ साली तिची वनडे संघातही निवड झाली. तेव्हापासून संजीदाने ५४ टी२० सामने खेळले आहेत. त्यात तिने ११.३०च्या सरासरीने १ अर्धशतक लगावत ५२० धावा केल्या आहेत. तर १६ वनडे सामन्यात १७४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या’ सामन्यानंतर रात्रभर झोपू शकलो नाही, केएल राहुलने दिली प्रतिक्रिया
चेन्नईची साडेसाती संपेना! ‘हा’ खेळाडू आयपीएल २०२० हंगामातून झाला बाहेर
ट्रेंडिंग लेख-
धवनच्या शतकी खेळीनंतरही का झाला दिल्लीचा पंजाबविरुद्ध पराभव, जाणून घ्या ५ कारणे
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू
बाजीगर! आयपीएलमध्ये संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे १४ खेळाडू