१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या १३ व्या हंगामाला युएईमध्ये सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या संघात अबुधाबी येथे होईल. ५३ दिवसांच्या या आयपीएल हंगामातील सर्व सामने मिळून दुबई, शारजाह आणि अबुधाबी येथे होणार आहेत. यासाठी सर्व संघ युएईमध्ये पोहचले असून सर्व संघाचे सराव सुरु झाले आहेत.
आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली देखील दुबईला रवाना झाला आहे. त्याने याबद्दल इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे. त्याने पोस्ट केलेल्या फोटोत त्याने मास्क घातलेला आणि चेहऱ्याला शिल्ड घातलेलेही दिसत आहे. तसेच त्याने लिहिले आहे की ‘६ महिन्यांनंतर आयपीएलसाठी दुबईला माझा पहिला विमानप्रवास. आयुष्य बदलत आहे.’
दुबईमध्ये याआधी आशिया क्रिकेट कौन्सिलच्या बैठकाही मार्चमध्ये पार पडल्या होत्या. परंतु कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे गांगुली दुबईला गेला नव्हता.
आयपीएलचा १३ वा मोसम कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर होत आहे. हा हंगाम याआधी २९ मार्चपासून सुरु होणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे हा हंगाम पुढे ढकलावा लागला. तसेच हा हंगाम भारताबाहेरही हलवावा लागला. गांगुलीच्या आधी बीसीसीआय आणि आयपीएलचे आधिकारी युएईला पोहचले आहेत. यात आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेलांचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रेयस अय्यर विराट कोहलीला मेसेज पाठवतो; या विषयावर चर्चाही करतो
‘या’ देशातील खेळाडूंसाठी आहे आनंदाची बातमी, बोर्डाने पगारात केलीय ८३ टक्के वाढ
विराटशी तुलना करणे सोडा, मी तर त्याच्या आसपासही नाही…
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये झळकावणार शतक, पहा कोण आहेत ते ३ युवा भारतीय फलंदाज
आयपीएलच्या १३ व्या मोसमात या ३ सलामीच्या जोड्या यूएईमध्ये उभारणार धावांचा डोंगर?
३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध