दुबईत मंगळवारी (२७ ऑक्टोबर) आयपीएल २०२० च्या ४७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने दिल्ली कॅपिटल्सवर ८८ धावांनी विजय मिळवला. हा विजय हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरसाठी खास ठरला. कारण या सामन्यादिवशी वॉर्नर आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत होता. सामन्यानंतर वॉर्नरचा वाढदिवस भन्नाट पद्धतीने साजरा करण्यात आला.
सामना जिंकल्यानंतर रात्री वॉर्नरचा वाढदिवसाची संपूर्ण तयारी करून ठेवली होती. यादरम्यान वॉर्नरने आपल्या वाढदिवसाचा केक कापताच संघसहकाऱ्यांनी त्याला केक लावायला सुरुवात केली. यादरम्यानचा व्हिडिओ हैदराबाद संघाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “सामन्यानंतर रात्री ड्रेसिंग रूममध्ये काय झाले पाहा. केकबाबतही विसरू नका.”
Watch what happened in the dressing room after our crucial game last night ????
Don't miss the cake rituals too, #OrangeArmy ????#SRHvDC #KeepRising #Dream11IPL pic.twitter.com/3802fTzpjr
— SunRisers Hyderabad (@SunRisers) October 28, 2020
हैदराबादने शेअर केलेल्या व्हिडिओत, युवा फलंदाज प्रियम गर्ग आणि मनीष पांडे हे क्रिकेटपटू वॉर्नरच्या चेहऱ्यावर केक लावताना दिसत आहेत.
यासोबतच कर्णधार वॉर्नरनेही आपल्या संघसहकाऱ्यांवर केक फेकत मजा घेतली. यादरम्यान त्याने गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरनसह अनेक खेळाडूंच्या चेहऱ्यावरही केक लावला आहे.
हैदराबादने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.
दिल्लीविरुद्ध झालेल्या या सामन्यात कर्णधार वॉर्नरने ३४ चेंडूत ६६ धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर हैदराबादने २१९ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाचा डाव १३१ धावांवरच संपुष्टात आला. हा विजय मिळवत हैदराबादने गुणतालिकेत पाचव्या स्थानी उडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-पहिल्या ६ षटकांमध्येच गोलंदाजांचा धुव्वा उडवणारे विस्फोटक फलंदाज
-वाढदिवसाला गोलंदाजांची अशी धुलाई करणारा वॉर्नर आयपीएलमधील एकमेव भीडू
-हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय
ट्रेंडिंग लेख-
-अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला…
-वॉर्नरच्या आईने ‘तो’ एक निर्णय बदलला नसता तर जगाला दिग्गज क्रिकेटपटू मिळाला नसता!