मुंबई । भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ हा चतुर क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध आहे. हवेत सूर मारत अनेक अविस्मरणीय झेल पकडून भारतीय संघाकडे सामने फिरवले आहेत. 2002 इंग्लंडविरुद्ध झालेल्या नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्याची त्याने 82 धावांची अविस्मरणीय खेळी करत भारताला मालिका जिंकून दिली. सध्या समालोचकाच्या भूमिकेत असलेल्या कैफने महेंद्रसिंग धोनी यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे.
कैफने 2006 साली एका मालिकेदरम्यान प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्या समवेत संपूर्ण संघाला जेवणासाठी आपल्या घरी निमंत्रण दिले होते. त्यावेळी कैफने सीनिअर आणि ज्युनिअर खेळाडूंना वेगवेगळा खोलीत बसवले होते. तसेच तो सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग या खेळाडूंसोबतच सातत्याने राहून त्यांची चाहतदरी करायचा. मात्र, घरी आलेल्या सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी जास्त विचारपूस केली नाही. तसेच कैफने त्याच्या हाताने महेंद्रसिंग धोनीला बिर्याणी न वाढल्याने धोनी नाराज झाला होता. धोनीने ही गोष्ट वारंवार मोहम्मद कैफला बोलून दाखवली होती
पुणे महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार बनला आणि पुढे मोहम्मद कैफला संघात स्थान मिळाले नाही. केवळ बिर्याणी आपल्या हातांना न वाढल्यामुळे आपल्याला संघात स्थान गमावले असा धक्कादायक खुलासा मोहम्मद कैफने महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीत केला आहे.
मोहम्मद कैफ पुढे बोलताना म्हणाला की, धोनीच्या जागी अनेक खेळाडूंना आजमावण्यात आले. पण त्यापैकी कुणीच यशस्वी झाले नाहीत. सध्या तर त्याला कोणताच पर्याय नाही. केएल राहुल सध्या यष्टिरक्षकाची जबाबदारी पार पाडतोय. पण तो जास्त वेळ यष्टिरक्षण करू शकणार नाही.