मुंबई । प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो माहित आहे. ब्राव्हो टी -20 क्रिकेट जगभर खेळतो आणि भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये त्याचे लाखो चाहते आहेत. ड्वेन ब्राव्होचे व्यक्तिमत्त्व आणि त्याच्या खेळाविषयी प्रत्येकाला माहिती आहे’ परंतु फारच कमी लोकांना त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल माहिती आहे.
ड्वेन ब्राव्हो एका मुलाचा पिता आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. परंतु अद्याप त्याने लग्न केले नाही. ड्वेन ब्राव्होची जोसना खिता गोंजाल्व्हेज नावाची एक मैत्रीण आहे. ब्राव्होचे बर्याच वर्षांपासून तिच्याशी संबंध आहेत आणि दोघांनाही एक मुलगा आहे.
जोसना खिता गोंजाल्व्हेज पेशाने ‘शेफ’ आहे. ती तिच्या मुलासमवेत त्रिनिदादमध्ये राहते. जोसेनाने फ्रान्स, इटली आणि अमेरिकेत शेफचे प्रशिक्षण घेतले आहे.
जोसेना तिचे आयुष्य प्रत्येक कॅरिबियन नागरिकांसारखे आहे. ती बीचवर मित्रांसह पार्टी करते. ती बरयाचदा मित्रांसह मजेशीर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड करते.
जोसेना जिममध्ये खूप व्यायाम करते आणि म्हणूनच ती आई झाल्यानंतरही तंदुरुस्त आहे. बिचवर ती बर्याचदा बिकिनीमध्ये दिसून येते. सोशल मीडियावर त्याची बरीचसे फोटो बघायला मिळतात. 26 ऑगस्ट रोजी जोसन्नाचा वाढदिवस होता आणि ड्वेन ब्राव्होने देखील तिच्या मैत्रिणीस शुभेच्छा दिल्या.