fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

वाढदिवसाच्या दिवशीच धोनीला ‘हॅलीकॉप्टर’ भेट देणार हा व्यक्ती

मुंबई ।  7 जुलै या तारखेची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण याच दिवशी भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी यांचा वाढदिवस आहे. येणाऱ्या सात जुलै रोजी धोनी हा 39 वर्षांचा होईल. या वाढदिवसाच्या दिवशी ड्वेन ब्राव्हो धोनीला ‘हेलिकॉप्टर ‘गिफ्ट देणार आहे.

वेस्टइंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो धोनीला हेलिकॉप्टर गिफ्ट देणार आहे. मात्र आपण आश्चर्यचकित होऊ नका. हे खरेखुरे हेलिकॉप्टर नसून ड्वेन ब्रावोच्या गाण्याचे बोल आहेत. धोनीच्या वाढदिवसानिमित्त हे खास गाणे तयार करण्यात आले आहेत. सोमवारी त्याचे नवे गाणे ‘नंबर 7’ चे टीजर रिलीज केले आहे. सोशल मीडियावर हे व्हायरल झाले आहे. ड्वेन ब्रावो हे नवे गाणे धोनीच्या वाढदिवसादिवशी रिलीज करणार आहे.

धोनी आणि ब्राव्हो यांच्यात चांगली मैत्री आहे. दोघेही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंगच्या संघाकडून खेळतात. ब्राव्होने यापूर्वी धोनीच्या नेतृत्वाचे अनेकदा कौतुक केले आहे. ब्राव्होने यापूर्वी अनेक गाणी गायली आहेत. तो एक चांगला क्रिकेटपटू असून सोबत उत्कृष्ट गाणी देखील गातो.

डेव्हन ब्राव्होची अनेक गाणी आहेत पण त्याचे चॅम्पियन्स साँग फारच हिट झाले. ब्राव्होचे धोनीवर आधारित हे गीत प्रचंड व्हायरल झाले आहे. धोनीचे फॅन्स या गाण्यांवर जबरदस्त डान्स करताना दिसून येत आहेत.

You might also like