---Advertisement---

विराट कोहलीची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार? कारण आहे खूप खास

On: शनिवार, नोव्हेंबर 7, 2020 10:09 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या २ कसोटी सामन्यातून माघार घेण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याला भारतीय कसोटी संघातील मधल्या फळीत स्थान मिळू शकते. विराटची पत्नी अनुष्का शर्मा ही प्रेगनेन्ट आहे. ती जानेवारी महिन्यात आई बनेल. त्यामुळे विराट हा निर्णय घेऊ शकतो. परंतु, अद्याप त्याने यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही.

…म्हणून विराट घेऊ शकतो माघार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसआय) एका अधिकाऱ्याने याविषयी माहिती दिली आहे. ते अधिकारी म्हणाले की, “बीसीसीआयने नेहमी क्रिकेटपटूंच्या कुटुंबांना प्राथमिकता दिली आहे. अशात जर कर्णधार विराट कोहलीने पितृत्त्व रजा घेण्याचा निर्णय घेतला तर आम्हाला कसलीही हरकत नाही. तरीही तो पहिल्या २ कसोटी सामन्यात खेळताना दिसू शकतो.”

“बीसीसीआयने गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटपटूंना पितृत्त्व रजा (वडील होणार असल्याच्या कारणाने सुट्टी) घेण्यासाठी प्रोत्सहित केले आहे. त्यामुळे संघाच्या कर्णधारालाही ही मुभा अवश्य मिळेल. सामान्य स्थिती असली तर विराट बाळाच्या जन्मानंतर ऑस्ट्रेलियाला परत येऊ शकला असता. अशात तो फक्त एका कसोटी सामन्यातून बाहेर राहिला असता. पण कोविड-१९ मुळे करण्यात येणाऱ्या १४ दिवसांच्या क्वारंटाईन नियमामुळे त्याचे पुनरागमन अशक्य असेल. परंतु संघाकडे राहुलचा पर्याय उपलब्ध आहे,” असे पुढे त्यांनी सांगितले.

असे आहेत सामने 

१० नोव्हेंबर रोजी आयपीएल २०२०चा अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथे दोन्ही संघांदरम्यान २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका होणार आहे. तर ११ डिसेंबर ते १९ जानेवारीपर्यंत ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२१ पूर्वी होणार मेगा लिलाव?, पाहा काय आहे सद्य परिस्थिती

IPL Qualifier 2: हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉला डच्चू? ही नवी जोडी दिसू शकते सलामीला

‘चहल तू अपमानाचा नाही तर ट्रॉफीचा हक्कदार, आरसीबी सोड आणि…’, चाहत्याची अजब प्रतिक्रिया

ट्रेंडिंग लेख-

‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ टाकणारा ‘तो’ जितक्या वेगाने प्रसिद्ध झाला तितक्याच वेगाने क्रिकेटमधून गायब झाला

क्रिकेटर असलेल्या पोराला दुखापत झाली म्हणून अल्पभूधारक शेतकरी बापाने विकली होती जमीन

विराट सोबत क्रिकेटचं मैदान गाजवलेला ‘तो’ होणार बिहारचा मुख्यमंत्री?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---