भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला शनिवारी राम राम ठोकला आहे. त्याने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी संध्याकाळी ७.२९ वाजता इंस्टाग्रामवर पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली होती. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जरी घेतली असली, तरीही तो १९ सप्टेंबरपासून यूएईत सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात खेळताना दिसणार आहे. धोनीच्या आयपीएलमधील फलंदाजीबाबत भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने गोलंदाजांना एक सल्ला दिला आहे.
इरफानने स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात बोलताना म्हटले की, “या वर्षी आयपीएलमध्ये गोलंदाजांना एमएस धोनीचा सामना करताना सावध राहिले पाहिजे. धोनी जेव्हाही आयपीएलमध्ये खेळतो, तेव्हा मला वाटते की सर्व गोलंदाज तसेच माझ्यासारखे निवृत्त खेळाडूही खूप खुश होतील.”
“कारण ते त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करत नाहीत. तसं पाहिलं तर सीएसके संघाकडून खेळताना तो या गोष्टींचा खूप आनंद घेत असतो. मी या आयपीएलमध्ये खरं तर त्याला फलंदाजी करताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. सर्व गोलंदाज सावधान राहा,” असेही तो पुढे म्हणाला.
धोनीने आतापर्यंत ९० कसोटी, ३५० वनडे आणि ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ४८७६ धावा, वनडेत १०७७३ धावा आणि टी२०त १६१७ धावा केल्या आहेत. त्याने एकूण १६ आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत.
याव्यतिरिक्त त्याने आयपीएलमध्ये १९० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४२.२१ च्या सरासरीने ४४३२ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने २३ अर्धशतकेही ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-वयाच्या चौथ्या वर्षापासूनचा एमएस धोनीचा खास मित्र म्हणाला, त्याने आम्हाला…
-निवृत्ती जाहीर करण्यापुर्वी एमएस धोनी करत होता ती गोष्ट ज्यावर त्याचे आहे जिवापाड प्रेम
-भारताला विश्वचषक जिंकून देणारा प्रशिक्षक म्हणतोय, ‘धोनी सोबत असेल, तर…’
ट्रेंडिंग लेख-
-विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 12 वर्षे पूर्ण…
-आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकवणारे ३ भारतीय क्रिकेटपटू
-आयपीएल २०२०: आरसीबीसाठी असे असू शकतात सलामी जोडीचे ३ पर्याय