fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टुथपेस्ट व क्रीम खरेदी करणं पडलं कोचला भलतंच महागात, आता करता येणार नाही संघाला कोचिंग

Heiko Herrlich breaks quarantine rules

कोविड-१९ या जागतिक महामारीने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. जवळपास संपूर्ण क्रिडाक्षेत्र या महामारीमुळे ओस पडले आहे. मात्र, परिस्थितीत थोडेफार सुधार दिसत असल्याने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळांचे आयोजन करण्यावर विचार केला जात आहे.

परंतु, ज्या ठिकाणी खेळांचे आयोजन केले जात आहे, तिथे खेळाडू आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना काही दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवले जात आहे. अशात, एका संघाच्या प्रशिक्षकाला क्वारंटाइनदरम्यान टूथपेस्ट आणि क्रीम विकत घेण्यास जाणे खूप महागात पडले आहे. Heiko Herrlich breaks quarantine rules.

झाले असे की, आगसबर्ग फुटबॉल संघाचे ४८ वर्षीय प्रशिक्षक हीको हेरलिच (Heiko Herrlich) यांनी टूथपेस्ट आणि क्रीम विकत घेण्यासाठी क्वापरंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केले. ते टूथपेस्ट व क्रीम विकत घेण्यासाठी हॉटेलच्या बाहेर निघाले आणि सुपरमार्केटला गेले. त्यांच्या या वर्तणुकीमुळे त्यांना शनिवार (१६ मे)पासून सुरु होणाऱ्या जर्मनीतील बंदेसलीगा या मोठ्या फुटबॉल लीगमधील एका संघाच्या प्रशिक्षकपदावरून काढून टाकण्यात आले आहे.

हेरलिच हे आगसबर्ग विरुद्ध वोल्फ्सबर्ग या फुटबॉल सामन्यामधून आपल्या प्रशिक्षण कारकिर्दीची सुरुवात करणार होते. त्यांना आगसबर्ग संघाच्या प्रशिक्षणपदी निवड झाल्याची बातमी २ महिन्यांपुर्वीच मिळाली होती. पण, कोरोना व्हायरसमुळे त्यांना २ महिने वाट पाहावी लागली. पण, त्यांच्या एका चुकीच्या पावलामुळे आता त्यांना बुंदेसलीगामध्ये  प्रशिक्षणाची संधी सध्या मिळणार नाही. पुन्हा दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यावर ते संघाला प्रशिक्षण देणार आहेत.

हेरलिच बोलताना म्हणाले की, “अशा परिस्थितीत मी माझ्या संघासमोर आणि आणि जनतेसमोर एक आदर्श व्यक्ती ठरू शकलो नाही. माझ्या या चुकीमुळे मी आज माझ्या संघाचा सराव घेऊ शकलो नाही. तसेच, उद्या (१५ मे) होणाऱ्या सामन्यावेळीही मी अनुपस्थित असणार.”

जर्मनीच्या या माजी फुटबॉलपटूने यावर्षाच्या सुरुवातीला मार्टिन स्किमिटची जागा घेत आगसबर्ग संघाचे प्रशिक्षणपद मिळवले होते. ते २०२२पर्यंत संघाला प्रशिक्षण देणार होते.

ट्रेंडिंग घडामोडी-

बेटावर फसलेल्या दिग्गज खेळाडूच्या ‘सेक्स टेप’ ब्लॅकमेलरच्या हातात, आता…

परिवारासोबत घरी बसली होती मेरी कोम, तेवढ्यात दिल्ली पोलीस आले घरी

वेळेवर मिळाले नाही उपचार, जपानमध्ये सुमो पैलवानाचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू

You might also like