मागील अनेक दिवसांपासून आजारी असलेले माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जींचे सोमवारी निधन झाले आहे. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा अभिजीत मुखर्जीने दिली आहे. दिल्लीतील आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते पण त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. अखेर आज त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे.
राजकिय क्षेत्रात मोठे नाव कमावलेल्या प्रणव मुखर्जी यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी १९८०च्या सुमारास ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी ती स्विकारली नाही.
काहीवर्षांपूर्वी त्यांनी याबाबत खुलासा केला होता. भारतातील क्रिकेटच्या एका डॉक्यूमेंट्रिमध्ये बोलताना त्यांनी सांगितले होते की ‘१९८० च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा मला भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाची ऑफर मिळाली तेव्हा मला आश्चर्य वाटले होते. ही गोष्ट २५ वर्षांपूर्वीची होती.’
पण प्रणवदांनी ही ऑफर लगेचच नाकारली होती. ते म्हणाले होते, ‘मी तिथे काय करु.’ तसेच त्यांनी सांगितले की एक गावाकडील मुलगा म्हणून त्यांना क्रिकेटपेक्षा फुटबॉल जास्त आवडायचा.
याबरोबरच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष बीएन दत्त यांनीही खुलासा केला होता की प्रणवदांच्या घरी जगमोहन दालमिया अध्यक्षपदाची ऑफर देण्यासाठी गेले होते. पण सुरुवातील प्रणवदांनी हो म्हटले होते पण त्यांनी सांगितले होते की ते आधी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधीशी चर्चा करतील. दुसऱ्या दिवशी प्रणवदांनी ही ऑफर नाकारली. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की इंदिराजी त्यांना म्हणाल्या होत्या की त्यांच्याजवळ यासाठी वेळ आहे का? यापेक्षा त्यांना काही महत्त्वाची कामे करायची आहेत.
प्रणवदांना कपिल देव यांनी एक बॅटही भेट दिली होती त्यावेळी त्या बॅटवर त्याकाळच्या खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या होत्या.