नवी दिल्ली| इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळली गेलेली ३ सामन्यांची टी -२० मालिका मंगळवारी संपली. ही पहिली टी -२० मालिका होती, जी कोराना विषाणूच्या साथीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळली गेली. मालिकेत इंग्लंडच्या संघाने आघाडी घेतली होती, परंतु युवा खेळाडू हैदर अली आणि मोहम्मद हफीझच्या जोरावर पाकिस्तान संघ तिसऱ्या टी२० सामन्यात पुनरागमन करण्यात यशस्वी झाला आणि मालिका १-१ च्या बरोबरीने समाप्त झाली.
या मालिकेनंतर आयसीसीने टी -२० स्वरुपाची ताजी क्रमवारी जाहीर केली असून त्यामध्ये इंग्लंडचा युवा डेव्हिड मलान पुन्हा एकदा पहिल्या ५ फलंदाजांमध्ये परतला आहे, तर मालिकेत २ सामने खेळल्यानंतर १५५ धावा करणाऱ्या मोहम्मद हाफिजलाही खूप फायदा झाला आहे.
डेव्हिड मलान पहिल्या ५ मध्ये परतला
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत इंग्लंडचे सलामीवीर टॉम बंटन आणि डेव्हिड मालान यांना चांगली फलंदाजी करून खूप फायदा झाला आहे. टॉम बंटनने पाकिस्तानविरुद्ध १३७ धावा केल्या आणि १५७ स्थानांची झेप घेत ४३ व्या स्थानावर पोहोचला, तर डेव्हिड मलान ५ व्या क्रमांकावर आला आहे.
मोहम्मद हाफिजने २४ स्थानांची झेप घेतली
इंग्लंड विरुद्ध टी -२० मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीचा पाकिस्तानच्या मधल्या फळीतील फलंदाज मोहम्मद हाफिजला फायदा झाला. या मालिकेत हाफिजने एकतर्फी चांगली कामगिरी केली. हाफिज ६८ व्या स्थानावरून ४४ व्या स्थानावर आला. या मालिकेत हाफिजने १५५ धावा केल्या.
बाबर-राहुल टॉप वर आहेत
पाकिस्तानचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बाबर आजम प्रथम स्थानावर आहे. दुसर्या क्रमांकावर भारताचा केएल राहुल आहे. जॉनी बेअरस्टो देखील एका स्थानाने वर आला असून 22 व्या स्थानावर आहे .
गोलंदाजीच्या क्रमवारीत पाकिस्तानचा लेगस्पिनर शादाब खानलाही फायदा झाला आहे. शादाब एका स्थानाने वर आला असून आठव्या स्थानावर आला आहे. टॉम करन आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनीही संयुक्तपणे २० वे स्थान मिळवले. करनने ७ वे आणि शाहीनने १४ वे स्थान मिळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सुशांत सिंग केसमध्ये समोर आले विराट कोहली-रोहित शर्मा कनेक्शन
लसिथ मलिंगा नसला की मुंबईचं काही खरं नसतं, पहा इतिहास काय सांगतोय?
अखेर आयपीएलचे वेळापत्रक ‘या’ तारखेला होणार जाहीर; स्वत: बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात ५ षटकार
-आयपीएल २०२०: यंदा हे ३ संघ असतील सर्वात कमजोर; धोनीच्या सीएसकेचाही समावेश!
-आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज