आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान युएई येथे होणार आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व ८ संघांनी युएईला जाण्यासाठी तयारी सुरु केली आहे. पण त्याआधीच राजस्थान रॉयल्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. याबद्दल राजस्थान रॉयल्सने बुधवारी माहिती दिली आहे.
आयपीएल २०२० साठी सर्व संघ पुढील आठवड्यात युएईला रवाना होण्याची शक्यता आहे. पण त्याआधी सर्व संघसदस्यांना कोरोना चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
राजस्थान रॉयल्सने दिशांत बद्दल सांगितले की ‘त्यांचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक कोविड -१९ पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्याची चाचणी युएईला रवाना होण्याआधी संघाला मुंबई जमायचे आहे, हे लक्षात घेऊन करण्यात आली होती.’
तसेच राजस्थान रॉयल्सने असेही सांगितले की ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्व खेळाडू, सहाय्यक कर्मचारी युएईला जाण्याआधी शिफारस केलेल्या दोन चाचण्यां व्यतिरिक्त एक अतिरिक्त चाचणी घेण्याचा निर्णय फ्रँचायझीने घेतला होता.’
त्याचबरोबर याग्निक सध्या त्याच्या मूळ गावी उदयपुरमध्ये असून त्याला १४ दिवस रुग्णालयात क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दोन आठवड्यांचे क्वारंटाईन प्रक्रिया पूर्ण केल्यावर याग्निकच्या बीसीसीआयच्या कोविड प्रोटोकॉलनुसार दोन चाचण्या घेतल्या जातील आणि जर तो निगेटिव्ह आढळला तरच त्याला संघाशी जोडण्याची परवानगी देण्यात येईल.
युएईमध्ये आल्यानंतरही याग्निकला पुढील सहा दिवस वेगळे रहावे लागेल आणि तीन कोराना चाचण्या कराव्या लागतील, असेही फ्रांचायझीने सांगितले आहे. गेल्या १० दिवसांत याग्निकशी कोणताही खेळाडू संपर्कात आला नसल्याचीही फ्रँचायझीने पुष्टी केली आहे.
तसेच याग्निकने स्वत: याबद्दल ट्विट करत म्हटले आहे की गेल्या १० दिवसात त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्या. तसेच तो १४ दिवसांसाठी क्वारंटाईन झाला असल्याचेही त्याने सांगितले.
Hi all, I hv tested COVID +. Pls get tested if you hv been in contact with me in the last 10 days. In line wd BCCI protocols I will be now quarantining for 14 days. I will then need 2 ngtv tests b4 joining the team @rajasthanroyals in UAE. Thx 4 yr blessings & good wishes!
— Dishant Yagnik (@Dishantyagnik77) August 12, 2020
यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या याग्निकने आयपीएलमध्ये २५ सामने खेळले असून १७० धावा केल्या आहेत. तो आता राजस्थानचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून काम पहातो. त्याने प्रथम श्रेणीचे ५० सामने तर अ दर्जाने ४१ सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रसिद्धीच्या बाबतीत विराटच आहे अव्वल; टीम इंडियासहित ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंना टाकलंय मागे
१९९४ साली असे काही घडले की, गॅरी कर्स्टन स्वत: म्हणाले, मी तूला संघात स्थान देण्यासाठी शिफारस करेन
सीएसकेचे टेंशन वाढले, सुरुवातीच्या काही सामन्यातून बाहेर राहणार ‘हे’ धाकड खेळाडू
ट्रेंडिंग लेख –
भारताच्या ८८ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेले ५ कर्णधार
कसोटीत खेळताना जगभर धुमाकूळ घालणारे भारताचे सर्वात यशस्वी ५ गोलंदाज
४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला