आयपीएलचे एकही विजेतेपद न पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने बुधवारी (२१ ऑक्टोबर) आयपीएलच्या ३९ व्या सामन्यात कोलकातावर ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात बेंगलोरसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने चमकदार कामगिरी करत सर्वाधिक ३ विकेट्स चटकावले. यासोबतच तो आयपीएल इतिहासात पहिल्यांदा सलग २ निर्धाव षटके टाकणारा गोलंदाज बनला.
यादरम्यान त्याने कोलकाताच्या नितीश राणा, राहुल त्रिपाठी आणि टॉम बँटन यांसारख्या फलंदाजांना तंबूत पाठवले. पुढे फलंदाजीस येणाऱ्या फलंदाजांनाही फार चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे कोलकाताची फलंदाजी फळी पूर्णपणे ढासळली. आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
कोलकाताविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजची कहानी खूपच संघर्षमय राहिली आहे. त्यावर टाकलेली एक नजर…
मोहम्मद सिराजचे वडील चालवायचे रिक्षा
इतर खेळाडूंप्रमाणेच सिराजनेही क्रिकेटपटू बनण्यासाठी खूप मेहनत घेतली. सिराजचा जन्म हैदराबादमध्ये एका गरीब कुटुंबात १३ मार्च १९९४ साली झाला होता. सिराजचे वडील मोहम्मद गौस एक रिक्षा चालक होते. सिराजच्या वडिलांचीच अशी इच्छा होती की, त्याने एक क्रिकेटपटू व्हावे. त्यासाठी त्याच्या वडिलांनी सिराजला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. आपल्या क्रिकेटच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सिराज अधिकाधिक सराव करायचा. इतकेच नव्हे, तर रात्रीच्या वेळी त्याला संधी मिळायची, तेव्हाही तो क्रिकेटचा सराव करायला जात होता. सिराजने पहिल्यांदा क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्यावेळी तो ७वीमध्ये शिकत होता.
सिराजने मेहनत घेतली आणि शेवटी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यात यशस्वी झाला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करण्याचे फळ त्याला मिळाले आणि २०१७ च्या आयपीएल हंगामात त्याला सनरायझर्स हैदराबादने २.६ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले.
आयपीएलने बदलले आयुष्य
आयपीएलमध्ये खेळल्यानंतर सिराज ३ नोव्हेंबर २०१७ साली भारतीय टी२० संघात पदार्पण करण्यात यशस्वी राहिला. भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर सिराजने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. तरीही काही काळापूर्वी त्याच्या गोलंदाजीबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. परंतु तो या सर्व गोष्टींना मागे टाकत प्रामाणिकपणे आपले काम करत राहिला. शेवटी आयपीएल २०२० मध्ये कोलकाताविरुद्ध खेळलेल्या सामन्यात त्याने आयपीएल इतिहासात न बनलेला विक्रम आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
-कोलकाताच्या फलंदाजांना लोळवणाऱ्या सिराजला विराटने सामन्याआधी दिला होता ‘हा’ खास संदेश
-‘त्याला अगदी मनाप्रमाणे बाद केले’, आपल्या गोलंदाजीने केकेआरला इंगा दाखवणाऱ्या सिराजची प्रतिक्रिया
-मोहम्मद सिराजने केला कोलकाताच्या फलंदाजांचा चुराडा; नोंदवला मोठा विक्रम
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
-आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज
-आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज