या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटलच्या संघाने जबरदस्त कामगिरी केली. फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत प्रत्येक विभागात संघाने चांगली कामगिरी केली. मात्र, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्ली संघाने या हंगामात आत्तापर्यंत फक्त २ सामने गमावले आहेत आणि प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात संघ फॉर्ममध्ये दिसत आहे.
तथापि, अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे दिल्लीने लक्ष देणे आवश्यक आहे. जर लवकरच या गोष्टींची दखल घेतली गेली नाही तर नंतर संघाला समस्या उद्भवू शकतात.
आयपीएलचा निम्मा प्रवास संपला आहे आणि आता संघांना आणखीही मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत संघाने लवकरच त्या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे. दिल्ली कॅपिटल्स संघाला जर आपले पहिले आयपीएल विजेतेपद मिळवायचे असेल तर त्यांना या कमकुवत गोष्टींवर मात करावी लागेल. दिल्ली कॅपिटल्स संघातील त्या 3 प्रमुख कमकुवत असलेल्या गोष्टी काय आहेत ते जाणून घेऊया.
दिल्ली कॅपिटल्स संघाला या ३ प्रमुख गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
३. रिषभ पंत संघातून काही दिवस बाहेर
दिल्ली कॅपिटलचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत जरी दुखापतीमुळे पुढील काही दिवस खेळणार नसला तरी त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या सामन्यांत तो फॉर्ममध्ये दिसला नव्हता. पंतने आतापर्यंत कोणत्याही सामन्यात वेगवान डाव खेळला नाही. या मोसमात त्याने ६ सामन्यांत १३८ धावा केल्या असून त्याची सर्वाधिक धावा ३८ धावा आहेत.
त्यातच आता तोदुखापतीमुळे पुढच्या काही सामन्यांतून तो बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत त्याला सरावाला परत जाण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्यानंतर अगदी आयपीएल शेवटच्या टप्प्याकडे आली असताना त्याला पुनरागमन करणे सोपे असणार नाही. रिषभ पंत हा मॅच विनर खेळाडू आहे. म्हणूनच तो फॉर्ममध्ये असणे आणि लवकरात लवकर संघात परतने दिल्ली संघासाठी आवश्यक आहे.
२. मार्कस स्टोइनिसवर अधिक विश्वास
या आयपीएल हंगामात मार्कस स्टोइनिस दिल्ली कॅपिटलसाठी सर्वाधिक महत्वाचा खेळाडू ठरला आहे. त्याने ७ सामन्यांत १७५ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेटही १७५ आहे. कित्येक प्रसंगी अखेर स्टोइनिस जबरदस्त डाव खेळतो आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोचवून विजयी करतो.
तथापि, दिल्लीचा संघ स्टोइनिसवर खूप अवलंबून आहे. शिमरोन हिटमायरने तशा प्रकारची फलंदाजी केली नाही. जेव्हा मुंबईविरुद्धच्या सामन्यात स्टोइनिस चालला नाही तेव्हा अखेरच्या षटकात संघाला जलद गतीने धावा करता आल्या नाहीत. दिल्ली कॅपिटल्स संघाला याकडे लक्ष केंद्रित करावे लागेल, कारण जर प्लेऑफच्या कोणत्याही सामन्यात स्टोइनिस फ्लॉप झाला तर त्यांना अडचणी येतील.
१. शिखर धवनची संथ फलंदाजी
पृथ्वी शॉ आणि शिखर धवन दिल्ली कॅपिटलसाठी सलामीची जोडी म्हणून खेळतात. पृथ्वी शॉ एका टोकापासून जलद गतीने धावा करतो परंतु धवन दुसर्या टोकाकडून तितक्याच वेगाने धावा करण्यास अपयशी ठरत आहे. ज्यामुळे पृथ्वी शॉवर अधिक दबाव असतो. पॉवरप्लेमध्ये दोन्ही बाजूंनी वेगवान धावा केल्या गेल्या तर दिल्ली संघाला त्याचा अधिक फायदा होऊ शकेल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध धवनने संपूर्ण २० षटकांत फलंदाजी केली आणि तरीही त्याला अवघ्या ५२ चेंडूत ६९ धावा करता आल्या. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. धवनची फलंदाजी ही दिल्ली कॅपिटलची मुख्य कमकुवत बाजू आहे, ज्यावर त्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: सुपर सिक्स! धोनीने नटराजनला मारलेला षटकार ‘या’ कारणामुळे ठरलायं खास
हॉस्पिटलमधून परतलेला गेल कधी करणार मैदानात पुनरागमन? प्रशिक्षकाने दिले उत्तर
फॅन हूँ मैं! चाहत्याने चक्क सगळं घरच केलंय ‘धोनीमय’
ट्रेंडिंग लेख –
असे ३ खेळाडू ज्यांना किंग्ज इलेव्हन पंजाबने अंतिम ११ जणांच्या संघातून वगळले पाहिजे
वाढदिवस विशेष: क्रिकेटचा गंभीर शिलेदार
IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत