fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

४ अशी कारणे, ज्यामुळे श्रेयस अय्यरची दिल्ली कॅपिटल्स दुबई जिंकणारचं

ipl 2020 4 reasons why delhi capitals can become winners this time

August 8, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

दिल्ली कॅपिटल संघाचा आयपीएल इतिहास काही खास नाही. दिल्लीचा संघाने एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. तसे पाहता दिल्लीचा संघ आजपर्यंत आयपीएलच्या अंतिम फेरी पर्यंतही पोचू शकलेला नाही.
परंतु, आयपीएल २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल संघ हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसतो. आज या खास लेखात त्या ४ कारणांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे दिल्ली कॅपिटल संघ यावेळी आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकतो.

आयपीएल २०१९ मधील कामगिरीचे मनोबल
आयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटलने शानदार कामगिरी केली. सांघिक खेळीमुळे दिल्ली कॅपिटल संघ आयपीएल २०२० मधील पॉईंट टेबलवर क्रमांक ३ वर आला होता.
दुसऱ्या कॉलीफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल संघाला चेन्नई सुपर किंग्जडून पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या मोसमात दिल्ली संघ प्लेऑफमधून बाहेर पडला असला तरी आयपीएल २०२० मध्ये संघाला गेल्या मोसमातील चांगल्या कामगिरीचा आत्मविश्वास नक्कीच मिळेल.
दिल्लीचा संघ आयपीएल २०२० मध्ये निश्चितच चांगले मनोधैर्य घेऊन मैदानावर उतरेल आणि त्यांचे हे मनोबल त्यांना आयपीएलचे जेतेपद पटकावण्यास भाग पाडू शकते.

दिल्ली संघात आहेत उत्कृष्ट फिरकीपटू
दिल्ली कॅपिटल संघात फिरकीपटूंचा मोठा भरणा आहे. त्यांच्याकडे खरोखर अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत. त्याच्याकडे अमित मिश्रासारखा अनुभवी लेगस्पिनरही आहे. डावखुरा अक्षर पटेल देखील आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना चकवतो. त्याचबरोबर नेपाळचा युवा फिरकीपटू संदीप लामिछानेकडेही फिरकीचा पर्याय आहे. हा फिरकीपटू दर्जेदार फिरकीपटू आहे. या चार फिरकी गोलंदाजांना युएईमध्ये फिरकी अनुकूल खेळपट्ट्या मिळाल्या, तर दिल्ली कॅपिटलना हरविणे कोणत्याही संघाला कठीण जाणार नाही.

दिल्लीकडे आहेत जबरदस्त फलंदाज
दिल्ली कॅपिटलची फलंदाजीची क्रमवारी पूर्वीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे, कारण अजिंक्य रहाणेच्या समावेशामुळे आता संघाकडे अनुभवाचाही अभाव नाही. सध्या दिल्ली कॅपिटल संघात शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर,रीषभ पंत असे प्रतिभावान फलंदाज आहेत. आयपीएलच्या लिलावात संघाने ऑस्ट्रेलियाचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरी आणि शिमरॉन हेटमीयर यांना विकत घेतले आणि संघ अधिक मजबूत केला. आता अय्यरकडे पूर्वीपेक्षा फलंदाजीचे पर्याय अधिक आहेत. दिल्ली कॅपिटलचा फलंदाजीचा क्रम आधीच संतुलित असल्याचे दिसते.

जबरदस्त कोचिंग स्टाफ
दिल्ली कॅपिटलमध्ये उत्तम प्रशिक्षक आणि सपोर्टींग स्टाफ आहे. वास्तविक त्यांचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आहे ज्याने २००३ आणि २००७ मध्ये विश्वचषक जिंकला होता. २०१५ मध्ये मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलचे विजेतेपद जिंकले त्यावेळी संघाचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग होता. दिल्ली कॅपिटलमध्ये मोहम्मद कैफच्या रूपाने सहाय्यक प्रशिक्षकही आहे. तसेच बरेच दिग्गजही दिल्ली कॅपिटल संघाशी संबंधित आहेत. रिकी पॉन्टिंग हे मुख्य प्रशिक्षक असल्याने दिल्ली कॅपिटलची थिंक टँक चांगलीच दिसते आणि ही थिंक टँक त्याच्या शानदार योजनांनी दिल्ली टीमला आयपीएल २०२० चे विजेतेपद देऊ शकते.


Previous Post

जगातील ३ असे गोलंदाज, ज्यांनी किंग कोहलीला दाखवला आहे सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता

Next Post

आयपीएलमध्ये कशीही कामगिरी केली तरी या ५ खेळाडूंना पुन्हा भारतीय संघात संधी नाही

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Photo Courtesy; Twitter/@anavin74
Covid19

‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/@IPLT20.com
IPL

कृणाल पंड्याच्या ‘सुपर थ्रो’ने आरसीबी चाहत्यांचा रोखला होता श्वास; पाहा डिविलियर्सला धावबाद केलेला तो क्षण

April 10, 2021
Next Post

आयपीएलमध्ये कशीही कामगिरी केली तरी या ५ खेळाडूंना पुन्हा भारतीय संघात संधी नाही

आयपीएल म्हटलं की पाकिस्तानी क्रिकेटरच्या पोटात दुखतं, या माजी क्रिकेटरने केली टीका

आयपीएलपाठोपाठ विव्होने सोडले आणखी २ टायटल स्पॉन्सरशीप; या २ इव्हेंट्सला बसणार मोठा फटका

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.