आयपीएलच्या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे हा हंगाम भारताबाहेर युएईमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता आयपीएलमधील सहभागी सर्व संघांची युएईला जाण्याची तयारी सुरु झाली आहे. यावेळी काही संघ बरोबर नेट गोलंदाजांनाही घेऊन जाणार आहेत. हे नेट गोलंदाज आयपीएल सुरु होईपर्यंत युएईमध्ये असतील.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघही आपल्याबरोबर नेट गोलंदाजांना युएईला बरोबर घेऊन जाणार आहे. या नेट गोलंदाजांमध्ये विदर्भाच्या आदित्य ठाकरेचाही समावेश आहे. त्याचा बेंगलोरच्या डेव्हलपमेंट स्क्वाडमध्ये समावेश आहे.
याबद्दल विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या एका सुत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की ‘बीसीसीआयने जारी केलेल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार आदित्य ठाकरेची कोरोना टेस्ट केली आहे. आदित्यला आरसीबीच्या संघामध्ये पाहून छान वाटत आहे. तो जर नेटमधील सपोर्ट स्टाफ आणि कर्णधार विराट कोहलीला प्रभावित करण्यात यशस्वी ठरला तर काय माहित उद्या काय होईल.’
आदित्यने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे तसेच २३ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो २०१८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भागही होता. त्याचबरोबर त्याला २०१७-१८ मध्ये पहिल्यांदा रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. विशेष म्हणजे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पण २०१७-१८ च्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातून झाले. त्या अंतिम सामन्यात त्याने दिल्लीविरुद्ध २ विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच मागील हंगामात कर्नल सीके नायडू ट्रॉफीमध्येही १९ वर्षांखालील राजस्थान संघाविरुद्ध त्याने १२ विकेट्स, तर त्या पुढील सामन्यातच त्याने पंजाबविरुद्ध ७ विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले होते. तसेच त्याने यावर्षी जानेवारीमध्ये दिल्लीविरुद्ध रणजी ट्रॉफीमध्ये घेतलेल्या ७ विकेट्समुळे बेंगलोर संघाचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांना प्रभावित केले होते. ते त्याला फेब्रुवारीमध्ये भेटले आणि त्यांनी त्याचा बेंगलोरच्या डेव्हलपमेंट स्क्वाडमध्ये समावेश केला.
त्याला बेंगलोर संघात मिळालेल्या संधीबद्दल विदर्भाचे माजी प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत म्हणाले, की त्याने या संधीचा फायदा घेतला पाहिजे. यातून त्याने शक्य तितक्या गोष्टी शिकल्या पाहिजेत.
महत्त्वाच्या बातम्या –
स्वातंत्र्यानंतर प्रत्येक दशकात भारताला मिळाला एकतरी हिरो, जाणून घ्या प्रत्येकाबद्दल
याला म्हणतात आयपीएलची ताकद! देशाच्या संघाबरोबर जाण्याऐवजी त्याने दिले आयपीएलला प्राधान्य
ट्रेंडिंग लेख –
डावखुऱ्या़ क्रिकेटर्सची ड्रीम ११, पहा कोण आहे कर्णधार
न थांबता सलग पराभव पदरात पडलेले जगातील सर्वात दुर्दैवी देश, सलग २२ सामने पराभूत झाला होता हा संघ
क्रिकेटला रामराम केल्यावर मॅनेजमेंटची डिग्री घेऊन अमेरिकन एक्सप्रेससाठी काम करणारा क्रिकेटर