जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स आयपीएल २०२० साठी रविवारी (४ ऑक्टोबर) युएईत पोहोचला आहे. आयपीएलमध्ये कोव्हिड-१९ प्रोटोकॉलनुसार तो ६ दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर आपल्या राजस्थान रॉयल्स संघात सामील होणार आहे. स्टोक्स आपल्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या आपल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी न्यूझीलंडमध्ये होता. त्यामुळे त्याला स्पर्धेतील सुरुवातीचे काही सामने खेळता आले नव्हते. त्याने पाकिस्तानविरुद्धची मालिकाही मध्येच सोडली होती.
रविवारी दुबईत पोहोचल्यानंतर स्टोक्सने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर करत लिहिले की, “दुबईमध्ये खूपच उष्णता आहे.”
Ben Stokes has been arrived…😎#IPL2020 #RR @rajasthanroyals @benstokes38 pic.twitter.com/uF9c0lDvB4
— Atul Waghmare (@WaghmareAtul19) October 4, 2020
स्टोक्सला राजस्थान रॉयल्सने २०१८ मध्ये १२.५ कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले होते. त्यानंतर यावर्षी त्याला राजस्थानने रिटेन केले होते. इंग्लंडला २०१९ मध्ये वनडे विश्वचषकात चॅम्पियन बनवण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या स्टोक्सने ६७ कसोटी, ९५ वनडे आणि २६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांचा अनुभव आहे.
स्टोक्स १४ ऑक्टोबरला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसू शकतो. यापूर्वी तो ११ ऑक्टोबरला सनरायझर्स हैदराबादविरुद्धही मैदानात उतरू शकतो. परंतु सरावाशिवाय मैदानात उतरणे घाईचे ठरू शकते.
यापूर्वी राजस्थानशी संबंधित एका सूत्राने सांगितले होते की, स्टोक्स लवकरच संघात सामील होईल आणि क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर संघातील खेळाडूंची भेट घेईल. तेच फ्रँचायझी संघाने स्टोक्सचा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो युएईसाठी रवाना झाला होता.
Stoked. 😁✈️#HallaBol | #RoyalsFamily | @benstokes38 pic.twitter.com/pcAvyIcaaF
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) October 3, 2020
https://www.instagram.com/p/CF21QGUlYd8/?utm_source=ig_web_copy_link
स्टोक्सने यापूर्वी आपल्या इंस्टाग्रामवरून आपल्या कुटुंबासोबत एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, “‘निरोप’ घेणे कधीच सोपे नसते.”