भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ड्रीम ११ ला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२० चे मुख्य प्रायोजक म्हणून निवडले आहे. यापूर्वीच बीसीसीआयशी संलग्न असलेल्या, ड्रीम ११ ने टाटा सन्सला मागे टाकत आयपीएलच्या १३व्या हंगामाचे प्रायोजकत्व जिंकले आहे.
ड्रीम ११ आणि टाटा सन्स व्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख प्रायोजक असलेल्या बायजूस व अनअकॅडमी यांनी आयपीएलचे प्रायोजक होण्यासाठी निविदा भरली होती. ड्रीम ११ ने १९ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीसाठी २२२ कोटींची बोली लावल्याची माहिती आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली.
ड्रीम ११ ने त्यांच्या आर्थिक बोलीच्या जोरावर आयपीएल २०२० चे प्रायोजकत्व जिंकलेले दिसून येते. बीसीसीआयने आधी म्हटले होते की, फक्त पैशांचा विचार करून प्रायोजकत्व दिले जाणार नाही. मात्र, दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली लावणाऱ्या अनअकॅडमी पेक्षा ड्रीम ११ ची बोली १२ कोटीपेक्षा अधिक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, प्रायोजकत्व देताना आर्थिक बाबींचा विचार नक्कीच केला गेला आहे.
याआधी, आयपीएलचे मुख्य प्रायोजक असलेल्या विवो या चीनच्या मोबाईल निर्मिती कंपनीने, यावर्षीसाठी प्रायोजकत्व करण्यास नकार दिला होता. भारत व चीन यादरम्यान सुरू असलेल्या वादामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर, टाटा सन्स व पतांजली या भारतीय कंपन्या आयपीएलचे मुख्य प्रायोजक होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, ड्रीम ११ च्या निवडीने या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-ठरलं तर: यावर्षीचा खेल रत्न पुरस्कार मिळणार या सलामीवीर क्रिकेटरला
-चहलच्या होणाऱ्या पत्नीने केला ‘दारू बदनाम’ गाण्यावर धमाकेदार डान्स; व्हिडिओ झाला व्हायरल
-सचिन-रोहितच्या शतकांचे विक्रम मोडतील, पण धोनीचे हे विक्रम कोणीही मोडू शकणार नाही,’ पाहा कोण म्हणतंय
ट्रेंडिंग लेख-
-वडिलांचा अंत्यविधी पार पडल्यानंतर अचानक सकाळी सकाळी विराट पुन्हा संघात दाखल झाला
-आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकवणारे ३ भारतीय क्रिकेटपटू
-आयपीएल २०२०: आरसीबीसाठी असे असू शकतात सलामी जोडीचे ३ पर्याय