कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध बुधवारी (२१ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ८ विकेट्सने शानदार विजय मिळवला होता. या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने चमकदार गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सामन्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला आहे. असे असले तरी यापूर्वी मागच्या हंगामात त्याला आपल्या गोलंदाजीसाठी टीकेचा सामना करावा लागला होता. परंतु या हंगामात पुनरागमन करत त्याने टीकाकारांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
सिराजने सांगितले की, भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनीने कशाप्रकारे त्याला टीकाकारांचा सामना करण्यास शिकवले आहे. तो म्हणाला, धोनीने त्याला सल्ला दिला होता की, कधीच इतरांचे चांगले किंवा वाईट मत गांभीर्याने घेऊ नको.
बेंगलोरच्या अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओत सिराजने म्हटले की, “माही भाई (एमएस धोनी) नेहमी सल्ला देतो की, कधीच कोणाचे मत गांभीर्याने घेतले नाही पाहिजे. एक खराब सामना आणि ते सांगतील की तुम्ही चांगले खेळाडू नाहीत. जर तुम्ही त्याचाच विचार करत राहिला, तर वेडे व्हाल. आपले लक्ष नेहमी पुढील सामन्यावर असले पाहिजे. हेच लोक चांगली गोलंदाजी केल्यामुळे तुमची प्रशंसाही करतील.”
https://youtu.be/D7mrhhVYJVo
सिराजने पुढे बोलताना सांगितले की, कोलकाताविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याचे वडील रुग्णालयात दाखल झाले होते. तो म्हणाला, “माझे वडील सामन्याच्या एक दिवसाआधी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यावेळी मी त्यांच्या चिंतेत होतो. सामन्यानंतर मी घरी फोन केला आणि आश्चर्यचकित झालो की ते परत आले आहेत. हे माझ्यासाठी आणखी एक चांगली बातमी होती.”
आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच सलग २ निर्धाव षटके टाकणारा सिराज पहिलाच गोलंदाज ठरला आहे. कोलकाताविरुद्ध खेळताना त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ८ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या.
रविवारी (२५ ऑक्टोबर) बेंगलोर संघ चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सामना खेळत आहे. या सामन्यातही बेंगलोर संघाला सिराजकडून चांगली गोलंदाजी करण्याची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मोहम्मद सिराजने केला कोलकाताच्या फलंदाजांचा चुराडा; नोंदवला मोठा विक्रम
-‘त्याला अगदी मनाप्रमाणे बाद केले’, आपल्या गोलंदाजीने केकेआरला इंगा दाखवणाऱ्या सिराजची प्रतिक्रिया
-कोलकाताच्या फलंदाजांना लोळवणाऱ्या सिराजला विराटने सामन्याआधी दिला होता ‘हा’ खास संदेश
ट्रेंडिंग लेख-
-कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी
-वॉटसनसह ‘या’ ३ दिग्गजांना पुढच्या हंगामात मिळणार डच्चू?
-असा देवमाणूस; ज्याने भारतीय संघाला शिकवले सामने जिंकण्याचे सायन्स