fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता रैना म्हणतो; सीएसकेत परत येणार, पण फक्त या व्यक्तीसाठी

IPL 2020 Suresh Raina may Comeback for Season in Chennai Super Kings MS Dhoni Team Management

September 3, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ IPL

Photo Courtesy: Twitter/ IPL


नवी दिल्ली। बीसीसीआयतर्फे यूएईत आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व संघ तयारीसाठी यूएईमध्ये दाखल झाले आहेत. या हंगामात चाहत्यांचा सर्वात आवडता संघ चेन्नई सुपर किंग्जसाठी सुरुवात फारशी चांगली नव्हती. खेळाडू कोरोना व्हायरसचे बळी ठरले, तर संघाचा उपकर्णधार सुरेश रैनाने अचानक हंगाम सोडण्याचा निर्णय घेत सर्वांना आश्चर्यचकीत केले.

सुरेश रैना अचानक भारतात परत आल्याबद्दल बरीच चर्चा केली जात होती. पण आता सुरेश रैनाने स्वत:च यावर मौन तोडले आणि सांगितले की तो आपल्या कुटुंबासाठी परत आला आहे. जर सर्व काही ठीक झाले तर १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी तो पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जमध्ये येऊ शकतो.

विशेष म्हणजे रैना परतल्यानंतर त्याच्या आणि कर्णधार एमएस धोनी यांच्यात मतभेद झाल्याची अटकळ होती. परंतु रैनाने ते वृत्त फेटाळले. धोनीसह १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून सेवानिवृत्तीची घोषणा करणाऱ्या रैनाने त्याच्यात आणि फ्रेंचायझीमध्ये मतभेद झाल्याचे वृत्तही फेटाळून लावले.

रैनाला सीएसकेमध्ये नाही कोणतीही अडचण

रैनाने क्रिकबझला सांगितले की, “हा वैयक्तिक निर्णय होता आणि मला माझ्या कुटुंबासाठी परत यावे लागले. घरी काही गोष्टींचे त्वरीत निराकरण करण्याची आवश्यकता आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) देखील माझे कुटुंब आहे आणि माझ्यासाठी माही भाई (धोनी) खूप महत्वाचा आहे.”

“हा एक कठीण निर्णय होता. सीएसके आणि माझ्यामध्ये कोणतीही समस्या नाही. कोणीही 12.5 कोटी रुपयांना पाठ दाखविणार नाही आणि कोणत्याही आवश्यक कारणाशिवाय जाणार नाही. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो असलो तरी मी अजूनही तरूण आहे आणि मला सीएसकेकडून पुढील चार-पाच वर्षे आयपीएलमध्ये खेळायचे आहे,” असेही तो पुढे म्हणाला.

रैना संघात पुनरागमन करू शकतो

यादरम्यान, जेव्हा सुरेश रैनाला त्याच्या भविष्याबद्दल विचारले गेले, तेव्हा त्याने पुन्हा एकदा दुबईत संघात प्रवेश घेऊ शकेन, असे स्पष्ट केले. माध्यमांतील काही वृत्तांनुसार, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीलाहीआशा आहे की, आयपीएल २०२० मध्ये सुरेश रैना पुनरागमन करेल.

तो म्हणाला, “मी क्वारंटाईनच्या काळात येथे प्रशिक्षण घेत आहे. कदाचित तुम्ही मला तेथील शिबिरात पुन्हा पाहाल.”

व्यवस्थापनालाही अडचण नाही

सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के विश्वनाथन यांना रैनाच्या भविष्याबद्दल विचारले गेले, तेव्हा ते म्हणाले की टीम सर्व खेळाडूंना पूर्ण पाठिंबा देते.

ते म्हणाले, “रैना म्हणाला की तो या हंगामासाठी उपलब्ध नाही. आम्ही आमच्या खेळाडूंना नेहमीच पाठिंबा देत असतो. तो म्हणाला की त्यांच्या काही वैयक्तिक समस्या आहेत. म्हणून जेव्हा तो तंदुरुस्त आणि तयार असेल तो परत येऊ शकतो. आम्हाला हेच हवे आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

-नववी इयत्ता फेल; झाडू मारायचं करायचा काम मात्र आयपीएलने झटक्यात बदलली जिंदगी

-सुरेश रैना आयपीएल खेळणार नसल्याची ‘या’ खेळाडूने केली होती सहा वर्षांपूर्वी भविष्यवाणी

-आरसीबीच्या ‘या’ खेळाडूने सर्वांसमोर दिली होती गर्लफ्रेंडला शिवी, आता होतं नाहीये लग्न

ट्रेंडिंग लेख-

-कॅप्टन वगैरे तुमच्या देशात! आयपीएलमध्ये फक्त खेळाडू म्हणून खेळलेले दिग्गज

-जेव्हा पोरं बारावी शिकत असतात, त्या वयात आयपीएलमध्ये खणखणीत शतक करणारे क्रिकेटर

-३ कट्टर मित्रांचा आयपीएलमध्ये युवराज कधीही झाला नाही टीममेट


Previous Post

आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात ५ षटकार

Next Post

मुंबईला पहिल्याच सामन्यात पराभवाचे पाणी पाजण्यासाठी विराट उतरेल ‘या’ ११ खेळांडूसोबत

Related Posts

Pune District Purandar Taluka Pisarve Gram Panchayat Election Result Mahesh Waghmare Winning Candidate Special Story
ब्लॉग

युवा क्रीडा पत्रकारानं उधळला विजयी गुलाल! तालुक्यात एकच चर्चा, दुप्पट वयाच्या उमेदवाराला चीतपट केलंय पोरानं

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले रिषभ पंतचे कौतुक

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@lionsdenkxip
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC and @BCCI
टॉप बातम्या

“मी अजूनही धक्क्यातून सावरलो नाही”, भारतीय संघाच्या विजयानंतर रिकी पाँटिंग यांची प्रतिक्रिया

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

…म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा

January 20, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ mipaltan

मुंबईला पहिल्याच सामन्यात पराभवाचे पाणी पाजण्यासाठी विराट उतरेल 'या' ११ खेळांडूसोबत

सीपीएलमध्ये जेसन होल्डरच्या संघाची नवीन उल हक पुढे सपशेल शरणागती

Photo Courtesy: Twitter/ ICC

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या प्रशिक्षकाच्या कृत्यामुळे वसीम अक्रमची आगपाखड

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.