fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वॉर्नर, विलियम्सन, भुवनेश्वर म्हणतात आम्हीच होणार यंदाचा आयपीएल विजेता; हैदराबाद संघ मिळवणार…

ipl srh uae 2020 all time records david warner sunrisers hyderabad team records stats

September 22, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ Sunrisers

Photo Courtesy: Twitter/ Sunrisers


इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सनरायझर्स हैदराबादचा प्रवास खूप चढउतारांनी झाला. पहिल्या सत्रात संघाने ८ व्या क्रमांकावर स्थान मिळवले होते, परंतु त्यानंतरच्या वर्षी (२००९) त्यांनी विजेतेपद जिंकले. नंतर पुन्हा हैदराबादने २०१६ मध्ये दुसऱ्यांदा आयपीएल जिंकला. ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात यंदा सनरायझर्सकडे तिसरे विजेतेपद जिंकण्याची संधी आहे.

सनरायझर्स संघात वॉर्नरव्यतिरिक्त केन विल्यमसन, भुवनेश्वर कुमार आणि अफगाणिस्तानचा अष्टपैलू राशिद खान यांचा समावेश आहे. या दिग्गजांच्या बळावर सनरायझर्ससुद्धा यावेळी आयपीएलचा प्रबळ दावेदार आहे.

वॉर्नरच्या नेतृत्वात हैदराबाद दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला. वॉर्नर २००९ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. २०१४ मध्ये तो सनरायझर्समध्ये सामील झाला. त्यानंतर त्याने २०१५ मध्ये संघाची लगाम हाती घेतली. २०१६ मध्ये त्याच्या नेतृत्वात सनरायझर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) याचा पराभव करून आयपीएलचे दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले. २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक अ‍ॅडम गिलक्रिस्टच्या नेतृत्वात संघाने पहिले विजेतेपद जिंकले होते.

२०१३ मध्ये हैदराबाद संघाचे नाव आणि मालक बदलले. २०१३ मध्ये डेक्कन चार्जर्स या फ्रँचायझीचे नाव सनरायझर्स हैदराबाद करण्यात आले. त्यानंतर ही टीम सन टीव्ही नेटवर्कने विकत घेतली. सन समूहाने आर्थिक संकटातून हैदराबाद संघाला फ्रेंचायझी ४२५.२ कोटी रुपयांनी विकत घेऊन सावरले. यापूर्वी बीसीसीआयने डेक्कन चार्जर्सचा करार रद्द केला होता.
यूएईमधील १३ व्या हंगामातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सोबत झाला. या सामन्यात हैदराबाद संघाला बेंगलोर संघाने पराभूक केले. हैदराबाद संघानेही चांगला खेळ केला.

सनरायझर्स हैदराबाद संघाचा आयपीएलमधील आलेख

संघ २००९ आणि २०१६ मध्ये आयपीएल विजेता ठरला आणि ३ वेळा अंतिम सामना खेळाला आहे. या संघाकडून सर्वाधिक धावा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ने केल्यात. त्याने १२६ सामन्यात ४७०६ धावा केल्यात तर गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने ११७ सामन्यात १३३ बळी मिळवून संघाकडून सर्वाधिक बळी मिळवले आहेत.

मागील ५ हंगामातील ४ हंगामात सनरायझर्सचे फलंदाज होते टॉप मध्ये

२०१९ – डेव्हिड वॉर्नर – हैद्राबाद – १२ सामने – ६९२ धावा
२०१८ – केन विल्यमसन – हैद्राबाद – १७ सामने – ७३५ धावा
२०१७ – डेव्हिड वॉर्नर – हैद्राबाद – १४ सामने – ६४१ धावा
२०१६ – विराट कोहली – बेंगलुरू- १६ सामने – ९७३ धावा
२०१५ – डेव्हिड वॉर्नर – हैद्राबाद – १४ सामने – ५६२ धावा

२०१९ – एलिमिनेटर-

सर्वाधिक डेव्हिड वॉर्नर ६९२ धावा आणि सर्वाधिक खालील अहमद १९ बळी

२०१८ – रनरअप
केन विल्यमसन सर्वाधिक ७३५ धावा आणि सर्वाधिक रशीद खान आणि सिद्धार्थ कौल २१ बळी

२०१७ – एलिमिनेटर 
डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक ६४१ धावा आणि सर्वाधिक भुवनेश्वर कुमार २६ बळी

२०१६ – विजेता
डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक ८४८ धावा आणि सर्वाधिक भुवनेश्वर कुमार २३ बळी

२०१५ – नंबर ६
डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक ५६२ धावा आणि सर्वाधिक भुवनेश्वर कुमार १८ बळी

२०१४ – नंबर ६
डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक ५२८ धावा आणि सर्वाधिक भुवनेश्वर कुमार २० बळी

२०१३ – एलिमिनेटर –
शिखर धवन सर्वाधिक ३११ धावा आणि सर्वाधिक अमित मिश्रा २१ बळी

२०१२ – नंबर ८
शिखर धवन सर्वाधिक ५६९ धावा आणि सर्वाधिक मोर्ने मोर्कल १३ बळी

२०११ – नंबर ७
शिखर धवन सर्वाधिक ४०० धावा आणि सर्वाधिक अमित मिश्रा १९ बळी

२०१० – नंबर ३

अँड्र्यू सायमंड्स सर्वाधिक ४२९ धावा आणि सर्वाधिक प्रज्ञान ओझा २१ बळी

२००९ – विजेता
ऍडम गिलख्रिस्ट सर्वाधिक ४९५ धावा आणि सर्वाधिक आरपी सिंग २३ बळी

२००८ – नंबर ८
ऍडम गिलख्रिस्ट सर्वाधिक ४३६ धावा आणि सर्वाधिक आरपी सिंग १५ बळी

आयपीएल २०२० सनरायझर्स हैदराबाद संघ : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विलियम्सन, जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), मनीष पांडे, मोहम्मद नबी, प्रियांम गर्ग, विजय शंकर, रीद्धिमान साहा (यष्टीरक्षक), विराट सिंग, भुवनेश्वर कुमार, तुलसी थंपी, अभिषेक शर्मा, बिली स्टॅनलेक, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत गोस्वामी, सिद्धार्थ कौल, के.के. खलील अहमद, टी नटराजन, मिशेल मार्श, बावनका संदीप, फॅबियन एलेन, अब्दुल समद, संजय यादव आणि रशीद खान.


Previous Post

पहिल्याच सामन्यात विराटच्या बेंगलोरने मारली बाजी, १० धावांनी मिळवला दणदणीत विजय

Next Post

सनरायझर्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी; हा खेळाडू आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले रिषभ पंतचे कौतुक

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@lionsdenkxip
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC and @BCCI
टॉप बातम्या

“मी अजूनही धक्क्यातून सावरलो नाही”, भारतीय संघाच्या विजयानंतर रिकी पाँटिंग यांची प्रतिक्रिया

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

…म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

BAN vs WI : शाकिब अल हसनच्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर बांग्लादेशचा विंडीजवर ६ गड्यांनी विजय

January 20, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/Sunrisers

सनरायझर्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी; हा खेळाडू आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर

Photo Courtesy: Twitter/RCBTweets

आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात धमाकेदार अर्धशतकी खेळी करणारा हा युवा खेळाडू आहे तरी कोण?

Photo Courtesy: Twitter/RCBTweets

कौशल्य असेल तर तुम्ही कोणत्याही फलंदाजाला करू शकता बाद; या गोलंदाजाने दाखवून दिले

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.